बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : बिलोली तालुक्यातील मौजे-भोसी येथे एकता गणेश मंडळाच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. एकता गणेश मंडळाचे यंदाचे तिसरे वर्ष असून यावर्षी श्रीगणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली. मंडळाच्या वतीने महिला भगिनीं व विद्यार्थी यांच्या सुप्त गुनाना वाव मिळावे या हेतूने रांगोळी स्पर्धा, लहान मुलांसाठी भाषण स्पर्धा, नृत्य स्पर्धा, वृक्षरोपण,भजनाचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 11/9/ 24 रोजी हरिभक्त पारायण साईनाथ महाराज आळंदीकर यांचे प्रवचन संपन्न झाले. यामध्ये महिला भगिनी,भाविक भक्त यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. अनंत चतुर्दशी रोजी मंडळाच्या वतीने लाडूचा लिलाव बक्षीस वितरण,महाप्रसाद व लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशा डीजे डाॅलबी चा वापर न करता भजनी मंडळाच्या सांप्रदायिक अभंग गवळणीच्या ताल सुरामध्ये श्री गणेशाची भव्य अशी मिरवणूक निघणार आहे. अतिशय चांगला उपक्रम मंडळांनी राबवला असून मंडळास एक वेळ अवश्य भेट द्यावे असे आव्हान एकता गणेश मंडळ भोसी मंडळाचे अध्यक्ष व सर्व कमिटीने केले आहे.
Leave a reply