वीशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथिल पुरातन पांडवकालीन लेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र ढोकेश्वर मंदिराचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हवा, यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोकी शाळेचे सर्व विद्यार्थी व शाळेचे मुख्याध्यापक श्री.गोरडे सर व शिक्षक श्री. ठुबे सर, श्रीमती साठे मॅडम यांनी मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम दोन दिवसांपासून हाती घेतली आहे. आज दि. १३ शुक्रवार रोजी ढोकेश्वर मंदिर परिसरात साफसफाई व स्वच्छता मोहीम राबवून श्री क्षेत्र ढोकेश्वर देवस्थानला सहकार्य केले. यावेळी ढोकी गावचे माजी सरपंच बाबासाहेब नऱ्हे, पोपट वाकचौरे, आप्पासाहेब नऱ्हे, अशोक नऱ्हे, भास्कर खटके, दिलीप मोरे, सचिन तोरे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
पांडवकालीन पुरातन काळातील उत्तम कलाकुसरीचा नमुना असणारे ढोकेश्वर मंदिर हे श्रावण महिन्यात येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात तिसऱ्या श्रावणी सोमवारी यात्रा भरते यात्रेनंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा तयार होतो. परिसरात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे ढोकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा कचरा गोळा करून ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम दोन दिवसांपासून हाती घेतले आहे. ढोकेश्वर मंदिर परिसरात साफसफाई व स्वच्छता मोहीम हाती घेऊन मंदिर परिसरात साफसफाई केली त्याबद्दल ढोकेश्वर मंदिर पुरातत्व सर्व्हेक्षण सहकारी संतोष क्षीरसागर यांनी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची सोय केली. या उपक्रमाचे ढोकी गावच्या ग्रामस्थांकडून व टाकळीढोकेश्वर परिसरात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. शाळेच्या शिक्षकांचा व ग्रामस्थांचा सत्कार करून आभार मानले.
ढोकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी केला ढोकेश्वर मंदिर परिसर स्वच्छ, श्री ढोकेश्वर मंदिर परिसरात साफसफाई

0Share
Leave a reply