Disha Shakti

Uncategorized

जय हनुमान यात्रा कमिटी माध्यमातून मदनवाडी गावातील सहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये लेखन साहित्याचे वाटप

Spread the love

इंदापूर  प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : मदनवाडी,तालुका इंदापूर, जिल्हा पुणे .येथील “जय हनुमान यात्रा कमिटी यांचे वतीने मदनवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सहा प्राथमिक शाळेतील सुमारे 213 विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये एकरेघी,दोन रेघी ,चार रेघी वह्या व पेन वाटप करण्यात आले. मदनवाडी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना पुणे जिल्हा समन्वयक अँडवोकेट राहुल बंडगर यांनी ही संकल्पना मांडली होती. त्यास यात्रा कमिटीने मंजुरी देऊन शनिवार दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी हा कार्यक्रम सर्व शाळांमध्ये साजरा करण्यात आला.

मदनवाडी मुख्य शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिलीप बनकर यांनी प्रास्ताविक केले.तर सहशिक्षक श्री.प्रमोदकुमार कुदळे सर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पदवीधर शिक्षक श्री.प्रकाश वाघ सर,सहशिक्षक श्री.प्रसाद गावडे सर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यात्रा कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी यात्रा कमिटीच्यावतीने अध्यक्ष  रंगनाथ तात्या देवकाते यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मदनवाडी गावचे सरपंच नानासाहेब बंडगर, मा. सरपंच तुकाराम बंडगर, अँडवोकेट राहुल बंडगर, धनु दादा थोरात, संजय देवकाते, देवकाते, शिवाजी देवकाते, वचकल, मधुकर देवकाते व इतर ग्रामस्थ व यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.तसेच शाळेतील शाळा प्रमुख श्री.सूर्यकांत सपकळ,श्रीमती सुवर्णा खरात,श्री.तानाजी सुतार, श्रीमती हेळकर मॅडम ,श्रीमती कुसुम मल्लाव मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!