विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : यावर्षी राज्यासह तालुक्यात समाधानकारक पाऊस असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. याचबरोबर पारनेर शहर व ग्रामीण भागातही मोठ्या आनंदाने गणेशोत्सव साजरा होत असून विविध गणेश मंडळाच्या आरतींना अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी भेटी देऊन युवकांचा आनंद द्विगुणित केला.
पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या संख्येने असलेल्या गणेश मंडळांनी अत्यंत सुंदर देखावे उभे केले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी ग्रामीण भागासह जवळील तालुक्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, सुंदर देखावे हे यावर्षीच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्ये ठरले आहे. आपल्या देश हा विविध सांस्कृतिक आणि परंपरा सांगणारा आहे. गणेशोत्सवामुळे सर्वजण एकत्र येतात. अनेकांना सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे व्यासपीठ मिळते. यावर्षीचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक होत असून सर्वांनी एकत्र येऊन याचा आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी यांनी केले. दरम्यान ,सुरेश पठारे, अमोल साळवे, उपसरपंच शंकर बर्वे, दिलिप पाटोळे, भाऊसाहेब सैद जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनीही अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या आहेत.
गणेशोत्सवामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण : सुजित झावरे, पारनेर शहरासह ग्रामीण भागातील गणेश मंडळांना दिल्या भेटी

0Share
Leave a reply