दिशाशक्ती सोनई / ज्ञानेश्वर सुरशे : नेवासा तालुक्यातील सोनई जवळील झापवाडी शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत माहिती अशी की, झापवाडी शिवारातील कॅनॉल जवळील अशोक शिंदे यांच्या उसाच्या शेताजवळ 60 वर्षे वयाच्या अज्ञात महिलेचा मृतदेह सोमवार दि.16 रोजी सकाळी 8 वाजता आढळून आला. सदरील महिलेच्या अंगावर नऊवार साडी, केसाला लाल रंग, उजव्या हातावर तुळशीचे पान गोंदलेले, गळ्यात स्कार्फ व त्यावर लाल रंगाचे फुले असे वर्णन आहे.
सोनई पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून सदर महिलेस ओळखत असल्यास त्यांनी सोनई पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी केले आहे. सपोनी विजय माळी 9773987802, सुरज मेढे (पोलीस उपनिरीक्षक) 8459273272, पोहे कॉ दत्ता गावडे 9552511796
Leave a reply