Disha Shakti

इतर

नेवासा तालुक्यातील शहापूर-देवगाव रस्त्यालगत इदगाह मैदानाजवळील दर्ग्याजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

Spread the love

दिशाशक्ती विशेष / इनायत अत्तार : नेवासा तालुक्यातील देवगाव येथील शहापूर-देवगाव रस्त्यालगत इदगाह मैदानामध्ये असलेल्या दर्ग्याजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला. दुपारच्या सुमारास लहान मुले खेळण्यासाठी दर्गाह जवळ गेली असता तिथे कोणी तरी मृत अवस्थेत असल्याचे लक्षात येताच त्यांनी शेजारी राहणारे एका कुंटुबाला माहिती दिली. त्यानंतर तेथे शेजारी राहणार्‍या पैकी दोनचार व्यक्तींनी बघतिले असता सदर मृत व्यक्ती गावातील इलेक्ट्रीक वायरमन मोटार रिवाईडिंगचे काम करणारे हे देविदास शिवाजी ठोंबरे (वय 37) असल्याची खात्री झली. त्यानंतर त्यांनी पोलीस पाटील शिवाजीराव कोलते यांना माहिती दिली.

त्यांनी घटनास्थळी येवून माहिती घेत जवळ असलेल्या कुकाणा दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांना कल्पना दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन मृत व्यक्ती बघितली असता अंदाज व्यक्त करताना मयत झालेल्या व्यक्तीने विषारी औषध प्राशन केल्याचे दिसून येत असल्यासारखे वाटले. सदर व्यक्तीचे मृत्यूचे कारण समोर न आल्याने त्यांची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृत शव नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मनाजी जाधव या घटनेचा तपास करीत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!