अ.नगर प्रतिनीधी / वसंत रांधवण : कोतवाली पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मोरे (वय ३६) यांचा सोमवारी (दि. १६) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते दुपारी पोलिस ठाण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक संपल्यानंतर त्यांना हृदयििवकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिस हेड कॉन्स्टेबल मोरे पूर्वी तोफखाना पोलिस ठाण्यात कार्यरत होते. सध्या मार्केट यार्ड पोलिस चौकीत कार्यरत होते.
सोमवारी ते कर्तव्यावर होते.कोतवाली पोलिस ठाण्यातील विसर्जन मिरवणुकीत मोरे पांढरा कुर्ता व भगवा फेटा बांधून सहभागी झाले होते. त्यांनी पारंपरिक वाद्यावर ठेका धरत उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर सायंकाळी त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत मोरे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
नगरमध्ये दुपारी पोलिस ठाण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलचा सायंकाळी दुर्दवी मृत्यू

0Share
Leave a reply