दिशाशक्ती राहुरी / रमेश खेमनर : पंढरपूर येथील अमरण उपोषणास बसलेल्या समाज बांधवांना पाठींबा देण्यासाठी व महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावा यासाठी सकल धनगर समाजाच्यावतीने राहुरीत मार्केट यार्ड समोर उद्या १९ सप्टेंबर गुरुवारी नगर मनमाड महामार्गावर शेळी-मेंढी व घोड्यावर धनगरी बिऱ्हाड घेऊन, भव्य रास्ता रोको करण्यात येणार आह़े. त्याबाबतचे निवेदक समाज बांधवांच्यावतीने राहुरी प्रशासनाला देण्यात आले आह़े.
निवेदनात म्हंटले आह़े की महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावा यासाठी राज्यस्तरीय आमरण उपोषण सोमवार ०९ सप्टेंबर २०२४ पासून सुरु झाले आहे. सदर राज्यव्यापी आमरण उपोषण करिता पाठिंबा देण्यासाठी आम्ही राहुरी तालुक्यातील सकल धनगर जमात आपल्या माध्यमातून सरकारला कळवा की उपोषणाला बसलेले समाज बांधव यांचा लवकरात लवकर विचार करून धनगरांना एसटी आरक्षणाची ताबडतोब अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न मार्गी लावावा अशी कळकळीची विनंती करण्यात येत आहे व त्या आमरण उपोषणास पाठींबा म्हणून गुरुवार दिनांक १९/०९/२०२४ रोजी सकाळी ११.०० सकल धनगर समाज राहुरी तालूक्याचे वतीने रास्ता रोको करणेत येणार असून त्याची दखल आपल्यावतीने घेण्यात येण्याची मागणी समाज बांधव गंगाधर तमनर, डॉ.सोमनाथ देवकाते, ज्ञानेश्वर बाचकर, श्रीकांत बाचकर, बाबासाहेब केसकर, दत्तात्रय खेडकर, अनिल डोलनर यांच्यावतीने तसे पत्र राहुरी तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आह़े.
पंढरपूर येथील अमरण उपोषणास बसलेल्या समाज बांधवांना पाठींबा देण्यासाठी राहुरीत उद्या सकल धनगर समाजाच्यावतीने भव्य रास्ता रोको

0Share
Leave a reply