इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : युवा वर्गाला पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण देण्याच्या हेतूने महाराष्ट्रातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
तसेच सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष बापुराव थोरात, सचिव विजयभैय्या थोरात, संचालिका संगीताताई थोरात प्रमुख उपस्थित होते.“कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ इंदापूर , बारामती व दौंड परिसरातील युवक-युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून विठ्ठलराव थोरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिगवण. मध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची (स्कील डेव्हलपमेंट सेंटर ) स्थापना केली आहे. या अंतर्गत महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रा”चे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
महाविद्यालयातील या केंद्राद्वारे मोफत कौशल्य विकास कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे”, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य मोहिते सर यांनी यावेळी दिली.सदर उपक्रमास महाविद्यालयाचे संचालक संतोष थोरात व अजय थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी श्री राजेंद्र डोईफोडे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रतिनिधी यांच्यासह विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्राचार्य वंदना थोरात, प्रमिलाताई जाधव माजी जिल्हा परिषद सदस्या, अरुणा धवडे माजी सरपंच ग्रामपंचायत भिगवण, वंदना शेलार माजी सरपंच ग्रामपंचायत भिगवण रेखा पाचांगने माजी उपसरपंच ग्रामपंचायत भिगवण वैशाली वाकळे माजी सदस्या ग्रामपंचायत भिगवण, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विठ्ठलराव थोरात औद्योगीक प्रशिक्षण संस्था भिगवण मद्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन, देशाचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणाली द्वारे संपन्न

0Share
Leave a reply