नाशिक प्रतिनिधी /शेरूभाई मोमीन : मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघा मधून, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे, निष्ठावंत, उमदे नेतृत्व, आदर्श महाराष्ट्र समाजभूषण, गोर – गरिबांचे, कैवारी, 24 तास, अहोरात्र, अविरत, जन सेवेत सदैव अग्रेसर असलेले, सर्व सामान्यांचे, अष्टपैलू कणखर, नेतृत्व म्हणेजच, आपले सर्वांचे लोकप्रिय असलेले, समाजसेवक, कार्यसम्राट मा. श्री. शेख हनिफ बशिर हे ईच्छुक, असून, तरी त्यांना यावेळी संधी उपलब्ध करून द्यावी, तसेच, संपूर्ण नाशिक जिल्ह्यामधुन समस्त, सर्वच, ईच्छुक उमेदवार सकल मुस्लीम समाजातिल उमेदवार यांच्यासाठी आज सर्व नेते गण यांच्या विशेष शिष्टमंडळाद्वारे 2024 च्या विधानसभेसाठी सुमारे 40 मतदार संघासाठी ची जाहीर मागणी करण्यात आलेली आहेत.
याबाबत येत्या 2024 च्या विधानसभा, निवडणुकीसाठी ईच्छुकांकडून संपूर्ण माहिती चाचपणी सुरू झालेली आहे. सदर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकां मध्ये, संपूर्ण राज्यातिल समस्त सकल मुस्लिम – अल्पसंख्यांक समाजातिल मतदारांची संख्या ही विशेष निर्णायक ठरलेली असल्याने, म्हणून येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकी मध्ये सर्वच मुस्लिम अल्पसंख्यांक बहुल मतदार संघासाठी सुमारे एकूण 40 मतदार संघाची, जाहीर मागणी ही अल्पसंख्यांक विभाग मुंबई अल्पसंख्याक, मुंबई प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ नेते, मा.श्री. हाजी ईब्राहिम भाईजान, वक्फ बोर्डाचे, मा.चेअरमन, तथा, माजी आमदार एम.एम. शेख साहेब राष्ट्रवादी कॉग्रेसचे अल्पसंख्यांक विभाग प्रदेशाध्यक्ष श्री. जावेद हबीब, नाशिकजिल्हा शहराध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग नाशिक, मा. श्री. शेख हनिफ बशीर व.औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष अहमदभाई शहा, या सर्वांचे समक्ष व सर्वांचे संगनमताने मुस्लीम, समाजाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात म्हणून, लोकनेते मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेबांना निवेदन देण्यात आले. याबाबत प्रमुख निवेदन हे, आदर्श समाजभूषण, मा. शेख हनिफ बशिर यांना, महाविकास आघाडी कडून, मध्य नाशिक विधानसभा 124 साठी मुस्लीम उमेदवार द्यावा यासाठी मध्यनाशिक विधानसभे साठी उमेदवारी मिळावी म्हणून लोकनेते, मा. खा.शरदचंद्रजी पवार साहेंबांकडे सर्व ज्येष्ठ नेते गण, प्रमुख पदाधिकारी सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत, शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन सर्वांनुमते जाहीर मागणी करण्यात आली. राष्ट्रीय कॉग्रेसचे अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष, नाशिकशहर, आदर्श महाराष्ट्र सामाजिक समाजभूषण,
मा. श्री.हनिफभाई बशिर शेख,सोशल फाउंडेशन, व. असंख्य, मित्र परिवार, राष्ट्रीय काँग्रेस, अल्पसंख्यांक विभाग व. मुस्लिम समाजातिल,विविध/राजकीय सामाजिक क्षेत्रातील जेष्ठ नेते गण व. सर्व पदाधिकारी सदस्य हितचिंतक कार्यकर्ते, यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील सर्व ज्येष्ठ मुस्लिम अल्पसंख्यांक नेत्यांनी घेतली मुंबई येथे लोकनेते शरदचंद्रजी पवार यांची भेट

0Share
Leave a reply