नगर प्रतिनिधी / जितू शिंदे : बुधवार दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हास्तरीय शालेय वुशु स्पर्धा २०२४ संपन्न पडल्या. या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क, अहमदनगर येथे झाल्या.या स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचानलाय , महाराष्ट्र राज्य,पुणे व महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर मार्फत आयोजित केल्या होत्या.
या स्पर्धेत आपल्या छत्रपती अकॅडमी चे खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात रोहित काळे याने सुवर्णपदक व १९ वर्षे वयोगटात कौस्तुभ आवारे याने रौप्यपदक पटकावले.
हे दोन्ही खेळाडू प्रेमराज सारडा कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत.या स्पर्धेत विजयी झालेल्या मुलांना संघटनेचे सचिव लक्ष्मण उदमले सर, छत्रपती अकॅडमी चे मुख्य प्रशिक्षक नारायण कराळे सर, सारडा कॉलेजच्या प्राचार्या भोसले मॅडम, गणेश भगत, अनिल दादासाहेब तोडकर, तेजस रासकर,विक्रम भगत, सुनील कराळे, न्यू आर्ट कॉलेजचे क्रीडा प्रशिक्षक नडे सर, रेसिडेन्सी हायस्कूलचे क्रीडा प्रशिक्षक संदेश भागवत सर, प्रेमराज सारडा कॉलेजचे प्रो. साठे सर,मच्छिंद्र साळुंके सर,क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे सर , जिल्हा क्रीडा अधिकारी दिघे साहेब, क्रीडा अधिकारी फिलिप्स सर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.तसेच पुढे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या…
Homeक्रीडा / खेळछत्रपती अकॅडमीच्या रोहित काळेला सुवर्णपदक तर कौस्तुभ आवारेला जिल्हास्तरीय शालेय वुशु स्पर्धेत रौप्यपदक
छत्रपती अकॅडमीच्या रोहित काळेला सुवर्णपदक तर कौस्तुभ आवारेला जिल्हास्तरीय शालेय वुशु स्पर्धेत रौप्यपदक

0Share
Leave a reply