Disha Shakti

इतर

मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले : धरणाचे 11 दरवाजांतून 3 हजार क्युसेकने नदीत सोडले पाणी

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / आर.आर. जाधव : प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर मुळाधरण पाणलोट क्षेत्रात परतीच्या पाऊस धो धो कोसळत शेवटी मुळा धरण १००% भरल्याने लाभ क्षेत्रातील शेतकरी आनंदी असुन २६ हजार दसलक्ष घनफुट क्षमता असलेले मुळाधरण पुर्ण क्षमतेने भरले असल्याची नोंद मुळा पाटबंधारे विभागाने जाहीर केली पाणलोट क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस हजेरी लावत असल्याने मुळाधरण हळुहळु भरत असल्याने गेली ५० दिवसापासुन मुळानदीतुन जायकवाडीच्या दिशेने विसर्ग चालुच आहे पाणलोट क्षेत्रा बरोबरच लभक्षेत्रात वरूण राजाची कृपा झाली शासनाकडून शासकीय जलाशय परिचालन सुचि नुसार दि १६ ते ३० सप्टेंबर पर्यंत धरण पुर्ण क्षमतेने भरत असल्याच्या सुचनेनुसार मुळापाटबंधारे विभागाने २४ सप्टेबर रोजी पाणीसाठा १००% पुर्ण करून घेऊन पाण्याची जलाशयात येणारी अतिरीक्त आवक मुळा नदिपात्रात सोडण्यात आली आहे.

तसेच मुळा उजव्या व डाव्या कालव्या द्वारे ही पाण्याचा विसर्ग करण्यात आला असुन वांबोरी चारीद्वारे देखील १३२ दसलक्ष घनफुट पाणी सोडण्यात आले आहे वांबोरी चारीचे एक पंप ना दुरुस्त असनु सध्या दोन पंप चालु आहे पंपाच्या दुरुस्ती साठी १०२ साठवण बंधाऱ्या पैकी २४ बंधाऱ्यात पाणी जमा केले असुन नादुरुस्त पंपाच्या दुरुस्ती साठी साहित्य मिळत नसल्याने दुरुस्तीस अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले आहे सन १९७२ पासुन मुळा जलाशयात पाणी साठविण्यास सुरुवत केली तेव्हा पासुन ५२ पैकी ३५ वेळा धरण पुर्ण क्षमतेने भरले असुन या वर्षी धरण १०० टक्के भरल्याची हि ३६ वि वेळ आहे मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कु सायली पाटील ‘ उप अभियंता विलास पाटील , शाखा अभियंता राजेंद्र पारखे सहाय्यक सलीम शेख यांनी मुळा धरणाच्या पाणीसाठ्यावर नियंत्रण राखत पाणलोटत येणारी आवक – विसर्गाचा समतोल साधल्याने पुराचे धोके टाळण्यात यश आले आहे.

मुळा धरणातून विसर्गाद्वारे आतापर्यंत ७८५० दशलक्ष घनफुट इतके पाणी जायकवाडीच्या दिशेने धावले आहे अजुनही मुळा व देवनदी मधुन पाणी जायकवाडीच्या दिशेने वहात असुन मुळा धरण पुर्ण क्षमतेने भरले असल्याने पाण्याच्या आवके नुसार विसर्ग कमी जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिल्याने पाण्याच्या आवकेत वाढ होऊन विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीपात्रा शेजारील शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन कार्यकारी अभियंता कु सायली पाटील उप विभागीय अभियता श्री विलास पाटील यांनी केले आहे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!