नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलींद बच्छाव : नायगाव येथील बळवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ बी. फार्मसी नायगाव येथे जागतिक फार्मसिस्ट डे विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. याप्रसंगी *अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री शंतनू कोटगिरे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नायगाव तालुका केमिस्ट् अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर पाटील चव्हाण साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती
तसेच सचिव प्राध्यापक रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण साहेब प्राचार्य क्षीरसागर विशाल वसंतराव यांची प्रमुख उपस्थित होती. या कार्यक्रमास फार्मासिस्ट डे चे महत्व व सखोल मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी नायगाव येथील जेष्ठ फार्मासिट चा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply