मुंबई कांदिवली पश्चिम /भारत कवितके : कांदिवली पश्चिम येथील भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक 20 च्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता कांदिवली पश्चिम येथील महिला आधार भवन, के.डी.कंपाउंड, या ठिकाणी अत्योदयाचे प्रणेते, प्रखर राष्ट्रवादी व थोर विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी नगरसेवक, विधानसभा अध्यक्ष बाळा तावडे, कांदिवली येथील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान सिंह आणि निकम यांच्या हस्ते दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून पुष्प वाहून विनम्र अभिवादन केले.भारत कवितके यांनी सांगितले की,” पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 मध्ये झाला.त्यांचे वडील भगवती प्रसाद हे एक ज्योतिषी होते,आई रामप्यारी धार्मिक वृत्तीच्या होत्या.पंडित दीनदयाळ उपाध्याय जनसंघाचे अध्यक्ष होते.संगठण नेतृत्व हा गुण त्यांच्या कडे होता.मासिक ” राष्ट्रधर्म” साप्ताहिक ” पांचजन्य” आणि दैनिक ” स्वदेश” आदी चे संपादन त्यांनी केले.10 फेब्रुवारी 1968 मध्ये त्यांची मुगलसराय या रेल्वे स्टेशन वर हत्या करण्यात आली.
” या वेळी बाळा तावडे, भगवान सिंह, निकम,आर,एस, वर्मा यांनी येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी वाचन करून कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली.यावेळी कांदिवली परिसरातील भाजपचे पुरुष व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कांदिवली येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन चा कार्यक्रम संपन्न

0Share
Leave a reply