Disha Shakti

राजकीय

कर्जत / जामखेड राष्ट्रीय समाज पक्ष संपर्क कार्यालय उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न…

Spread the love

कर्जत जामखेड प्रतिनिधी / सुनिल खामगळ : नामदार महादेव जानकर साहेब यांच्या आदेशाने कर्जत जामखेड विधानसभा लढवण्याचे नुकतेच ठरले आहे त्या अनुषगांने कर्जत येते पक्ष कार्यलयाचे उघडण्यात आले आणि त्याचे उदघाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे . रमेश व्हरकटे यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे कर्जत जामखेड मधील संपर्क कार्यालय चे उद्घाटन २५ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे असे व्हरकटे यांनी सांगितले येत्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याने जनतेच्या कामे मार्गी लावण्यासाठी या कार्यालय करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शरद बाचकर, राज्य कार्यकारिणी सदस्य भानुदास हाके (मेजर) , शहाजीराजे कोरडकर जिल्हाध्यक्ष अहमदनगर दक्षिण, युवक जिल्हाध्यक्ष विकास दादा मासाळ,आत्माराम कुंडकर नगर दक्षिण लोकसभा अध्यक्ष, सोनू भाऊ भिसे कर्जत तालुकाध्यक्ष, डॉ. प्रकाश कारंडे जामखेड तालुकाध्यक्ष, नंदकिशोर खरात युवक तालुकाध्यक्ष जामखेड, महेंद्र कोपनर युवक तालुका अध्यक्ष कर्जत, भाऊसाहेब डोंबाळे कर्जत तालुका सरचिटणीस, सौ.रानी जाधव महिला अध्यक्ष कर्जत तालुका आदी कार्यकर्ते व पदाधिकारी या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!