Disha Shakti

राजकीय

शाळेत सी.सी.टी.व्ही.कॅमेरे व शालेय समित्या स्थापन न करणाऱ्या मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी मनसे तीव्र आंदोलन करणार : अतुल खरात

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / : विठ्ठल ठोंबरे : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर याठिकाणी शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच कर्मचाऱ्यांनीच अत्याचार केल्याने शासनाने सर्व शाळांना आदेश दिले आहे की सर्व शाळेत सी.सी. टी.व्ही.कॅमेरे बसवून द्यावी व विद्यार्थ्यांच्या समस्या आणि अडचणी पालकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक शाळेत पालक संघ व इतर विविध समित्या स्थापन करण्यात येते परंतु अनेक शाळेमध्ये शासनाच्या आदेशाचे पालन करताना दिसत नाही शासणाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अतुल खरात शहराध्यक्ष कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी तालुका अध्यक्ष अतुल खरात म्हणाले की गेल्या अनेक दिवसापासून विविध शाळा / कॉलेज मध्ये व परिसरामध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलींचे छेड छाडीचे प्रकार घडत होते. परंतु ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील एका शाळेत अल्पवयीन मुलींवर त्याच शाळेतील शीपाई कामगारांने अत्याचार केल्याचे उघडकीस करण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे. प्रथमता: या घटनेचा मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने जाहिर निषेध करतो व आशा घटना इतर शाळेतील मुलींसोबत घडू नये यासाठी प्रत्येक शाळेत पालक समिती बनून पालक मेळावा घेतले पाहिजे जेणेकरून त्या मेळाव्यामध्ये पालक व शिक्षकांचे संभाषण होऊन विद्यार्थ्यांची शिक्षणाची व इतर परिस्थितीची माहिती पालकांना कळेल व विद्यार्थ्यांचे शाळेतील काही समस्या असतील तर पालक शिक्षकांना सांगू शकतील परंतु शाळेचे अध्यक्ष, संचालक व इतर कार्यकारी व मुख्याध्यापक पालक समिती व इतर समित्या फक्त कागदोपत्री तयार करून कधीतरी एखादा पालक मेळावा घेतात,यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची समस्या पालकांपर्यंत पोहोचत नाहीत जाणून-बुजून शाळा चालक, मुख्याध्यापक पालकांना शाळेत बोलून पालक मेळावा घेत नाहीत. ज्या शाळा शासनाच्या नियमाप्रमाणे पालक मेळावा घेत नाहीत अशा शाळांवर व शाळेतील मुख्याध्यापकांवर कायदेशीर कारवाई करावी व तसेच बदलापूर शहरात अल्पवयीन विद्यार्थिनींनी वर अत्याचार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण देशभर पसरल्यामुळे याची दखल महाराष्ट्र राज्याचे शालेयशिक्षण मंत्री श्री. दिपक केसरकर साहेब यांनी घेऊन नुकतीच घोषणा करुन सांगितले की प्रत्येक शाळेमध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे लावणे बंधन कारक आहे. या आदेशाचे पालन न करणार्‍या शाळांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. अशी माहिती राज्यातील सर्व जनतेला प्रसार माध्यमातुन कळवले आहे. याची दखल घेऊन आपण प्रत्येक शाळेत सी. सी. टी. वी.कॅमेरे आहेत की नाही व सर्व शाळेमध्ये पालक समिती व इतर सर्व समित्या शाळांनी बनविले की नाही याची शहानीशा करावी. आम्ही देखील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतिने श्रीरामपूर तालुक्यातील प्रत्येक शाळेमध्ये जाऊन सी.सी टी.व्ही कॅमेरेची व शासनाने ठरवून दिलेल्या शाळेतील पालक समिती व इतर सर्व समित्या नेमलेत की नाही याची शहानीशा करणार आहोत याची आपण नोंद घ्यावी. आपण संबंधित शाळेला तसे कळवावेत तसेच

जर आम्हाला शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व शासन नियमाप्रमाणे शाळेतील समित्या अढळून न आल्यास त्या शाळेच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही व्हावी यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करणार आहोत आंदोलना प्रसंगी काही अनुचीत प्रकार घडल्यास आपण व संबंधीत शाळा जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असे मनसे विध्यर्थी सेना तालुका अध्यक्ष अतूल खरात म्हणाले.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, श्रीरामपूरचे संकेत शेलार
उपजिल्हाअध्यक्ष मनविसे,
अतुल खरात, तालुका अध्यक्ष मनविसे, कुणाल सूर्यवंशी, शहर अध्यक्ष मनविसे, व मनसे तालुका अध्यक्ष संजय नवथर, विलास पाटणी, रवी चव्हाण, अमोल साबणे, संजय शिंदे, राहुल शिंदे, संदीप विशंबर, बाळासाहेब ढाकणे, नितीन जाधव, श्रीराम थोरात , औदुंबर खरात , पुनमताई जाधव, शीतल गोरे, उज्वला दिवटे, स्वर्णा ससाणे, विकी परदेशी, चेतन दिवटे, लखन इंगळे, रवींद्र खरोटे,चेतन कांबळे, अक्षय काळे, दीपक सोनवणे,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!