राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे आज सकाळी माजी मंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी गोटुंबे आखाडा येथील गावास भेट दिली असता ग्रामस्थांनी अनेक समस्या त्यांच्या समोर मांडल्या असून अनेक विकासकामे रखडलेली असून त्यासाठी आमदार तनपुरे यांनी स्वतः गावासाठी पुढाकार घेऊन गावाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
गोटुंबे आखाडा येथील स्मशान भूमीची दुरवस्था तसेच गाव ते स्मशान भूमीपर्यंत रस्ता व रस्त्यावर व स्मशानभूमीत पथदिवे व गावातील अनेक रखडलेल्या विकासकामांबद्दल ग्रामस्थांनी तक्रारीचा पाढा वाचला तसेच या गावातील 41 व 42.सर्वे नं गायरान व शेतकऱ्याचा जमीनीबाबत चर्चा नागरिकांनी केल्या. यावेळी माजी उपसरपंच उमेश बाचकर, मा.उपसरपंच रविंद्र चौधरी, रामभाऊ तोडमल, व्हा. चेरमन नवनाथ शेटे, दिलीप जाधव दिपक शेडगे, अय्युबभाई पठाण, मंगेश शेटे, अशोक महाराज शेटे, जालिंदर गडधे, किशोर पवार, संतोष तोडमल, रामदास खेमनर, सुनिल शिंदे बापुसाहेब पेरणे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच काही दिवसांपूर्वी गोटुंबे आखाडा येथील सर्वे नंबर 41 व 42 संदर्भात आमदार प्राजक्त दादा तनपुरे व शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब नाना खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोटुंबे आखाडा येथील नागरीक रवींद्र चौधरी अशोक महाराज शेटे , मधुकर साळवे, गोरक्षनाथ चौधरी , जालिंदर शेडगे, मधुकर भवार, राजेंद्र शेटे, दादाभाई शेख, आदी ग्रामस्थांनी गावातील जागा नावावर होण्यासाठी थेट मंत्रालय गाठून गावातील जागा कायम करून नागरिकांची घरे नावावर करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
परंतु गावातील काही राजकीय लोकांनी श्रेयवादासाठी राजकीय आडकाठी घातल्याने त्यावर तोडगा निघू शकला नाही व त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्याने तो प्रश्न प्रलंबित राहिला परंतु आमदार प्राजक्त तनपुरे व रावसाहेब खेवरे नाना यांनी या विषयावर नक्की तोडगा काढू असे आश्वासन नागरीकांना दिले आहे.
Leave a reply