Disha Shakti

इतर

सोनई पोलिसांची अवैध धंद्यांविरुध्द धडक कारवाई

Spread the love

सोनई प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी पदभार स्विकारताच अवघ्या काही दिवसात परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुध्द धडक कारवाई सुरू केली आहे. या मध्ये घोडेगाव येथे अजिज मुसा शेख वय 38 रा घोडेगाव हा तेथील मारुती मंदिरा जवळ विना परवाना कल्याण मटका खेळताना व लोकांना खेळविताना मिळून आला. त्याचेकडुन 630 रुपये रोख रक्कम व जुगार हम खेळण्याचे साहित्य जप्त केले. दुसरी कारवाई घोडेगाव येथील झोपडपट्टी मध्ये टपरीमध्ये संभा हनुमंत बर्‍हाटे (वय 42) रा. घोडेगाव हा देखील विना परवाना कल्याण मटका खेळताना व लोकांना खेळविताना आढळून आला. त्याचे कडुन रोख रक्कम 730 व मटका खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. तिसरी कारवाई ही सोनई येथील दीपक लक्ष्मण भालेराव (वय 35) रा. सोनई राजवाडा हा स्वामी विवेकानंद चौकात एका पत्र्याच्या टपरीमध्ये विना परवाना गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करताना आढळून आला. त्याचे कडुन 1500 रुपये किंमतीची तयार दारू जप्त करण्यात आली. चौथी कारवाई सोनई येथील साहेबराव दाजी सोनवणे वय 68 रा. दरंदले गल्ली हा माधवबाबा चौकात एका पत्र्याच्या टपरीमध्ये विना परवाना गावठी हातभट्टीची 1000 रुपये किंमतीची तयार दारू विक्री करताना आढळून आला.

वरील सर्वांविरूध्द सोनई पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस करत आहेत. हि. कारवाई यापुढे ही अशाचा प्रकारे सुरू राहणार असल्याचे माळी यांनी सांगितले. त्यांचे या कारवाईने मात्र अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!