दिशाशक्ती प्रतिनिधी / आर.आर. जाधव : अहमदनगर जिल्हातील पाथर्डी तालुक्यातील मौजे आडगाव येथे दिनांक ११/१०/२०१८ रोजी फिर्यादी राजु रभाजी शिंदे यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की त्याचा भाऊ अशोक रभाजी शेंडे ह्याला आरोपी चंद्रकांत बर्फे, अमोल बर्फे, सुरेश बर्फे, शिवाजी बर्फे यांनी शेतामध्ये मारहाण करून अपहरण केलेले आहे व सदरिल घटनेस माणिक लोंढे हा प्रत्यक्ष साक्षीदार आहे अशा स्वरुपाची तक्रार दाखल केली. सदरिल तक्रारीवरून कलम ३६४ व ३४ भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरिल तक्रार दाखल करतांना अपिलार्थी (आरोपी) व फिर्यादी यांचे शेतीच्या कारणावरून वाद होते. तसेच फिर्यादी हा भारतीय सैन्यामध्ये कार्यरत आहे व त्याचा भाऊ हा गावामध्ये त्यांची शेतीचे कामकाज बघतो.
त्या नंतर दिनांक १२/१०/२०१८ रोजी मयत अशोक रभाजी शेंडे याचे धारवाडी शिवार येथे रस्त्याच्या कडेला प्रेत मिळुन आले त्यामुळे सदरिल प्रकारणामध्ये ३०२,२०१ ह्या प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले. सदरिल प्रेताच्या अंगावर मारहाणीच्या व तसेच जळालेच्या जखमा आढळुन आल्या.सदरिल प्रकारणामध्ये फिर्यादीच्या पुरविणी जबाबावरुन राजु बर्फे व सुनिल बर्फे यांचे आरोपी म्हणुन नांव घेण्यात आले त्यावरुन यांचे सुध्दा आरोपी म्हणुन सदरील गुन्हामध्ये नाव समाविष्ट करण्यात आले. ह्या प्रकारणात एकुन ६ आरोपी विरुध्द कलम ३०२, ३६३, २०१, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे दोषारोप पत्र माननीय न्यायालयात दाखल करण्यात आले.
सदरील प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे एकून १२ साक्षीदार तपासण्यात आले.सदरिल प्रकारणामध्ये आरोपी राजु बर्फ व सुनिल बर्फे यांची माननीय जिल्हा व सत्र व्यायालय अहमदनगर यांनी निंदाष मुक्तता केली व आरोपी चंद्रकांत वर्फे, अमोल बर्फे, सुरेश बर्फे, आणि शिवाजी बर्फे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच कलम ३०२ साठी रु ५,०००/- कलम ३२५ साठी रु. १०००/- कलम ३६४ प्रमाणे रु १०००/- कलम २०१ प्रमाणे प्रत्येकी दंड ठोकविण्यात आला.
सदरील न्यायनिर्यच्या विरुध्द वरिल ४ ही आरोपीनी माननीय उच्च न्यायालय खंड औरंगाबाद अपील दाखल करून अव्हानीत करण्यात आले. सदरिल प्रकरणाची अंतीम सुनावणी द्विसदस्यी पीठाचे न्यायमुर्ती आ जी अवचार व एन पी धोटे यांच्या समोर झाली. अंतीम युक्तीवादाच्या वेळेस साक्षीदार क्र ५ माणिक लोंढे ह्याच्या साक्ष ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालय यांनी शिक्षा सुनावण्यात आली होती. सदरिल साक्षीदार हा पेरलेला साक्षीदार असुन तो मयताचा व फिर्यादीचा जवळचा नातेवाईक आहे व सदरिल साक्षीदार हा विश्वसनिय नसुन सदरिल साक्षीदारावर अनेक गुन्हे प्रलंबित आहे तसेच सदरिल साक्षीदार हा नैसर्गिक नसुन हा खोटा साक्षीदार आहे हि बाब माननीय न्यायलयाच्या निदर्शनास आणुन दिली तसेच युक्तीवादाच्या पुष्ठयार्थ माननीय सवौच्य न्यायालयाचे व माननीय उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे हे विचारत घेऊन चारही आरोपींची जिल्हा न्यायलयात झालेली शिक्षा रद्द केली.
सदरिल प्रकारणामध्ये विधीज्ञ. सुनिल मगरे यांनी अपीलार्थ चंद्रकांत बर्फे व अमोल वर्फे त्यांच्या तर्फे कामकाज पाहिले आहे त्यांना विधीज्ञ. सी. एस. गवई, विधीज्ञ हेमंत मोरे, विधीज्ञ सुजाता मोरे, विधीज्ञ. प्रतिक्षा मगरे यांनी सहकार्य केले.
पाथर्डीतील आडगाव येथील खुनाच्या गुन्हात जन्मठेप झालेल्या चौघांची औरंगाबाद खंडपीठाकडून निर्दोष मुक्तता

0Share
Leave a reply