Disha Shakti

इतर

चणेगाव शिवारात प्रवरा उजव्या कालव्याच्या चारीत आढळला सायकलसह राहुरीतील सोनवणे नामक व्यक्तीचा मृतदेह

Spread the love

दिशाशक्ती प्रतिनीधी/  इनायत अत्तार : संगमनेर तालुक्यातील चणेगाव शिवारात शनिवारी (दि.28) सकाळी प्रवरा उजव्या कालव्यातील चारीत सायकलसह एक मृतदेह पडलेला आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत आश्वी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की चणेगाव शिवारातून प्रवरा उजवा कालवा जातो. याठिकाणी असलेल्या चारीत शनिवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास एक व्यक्ती सायकलसह पालथा पडलेला दिसला. त्यामुळे ही बातमी वार्‍यासारखी परिसरात पसरली असता बाबासाहेब सोनवणे यांनी तत्काळ आश्वी पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केल्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठवून दिला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृत पावलेली व्यक्ती ही राहुरी तालुक्यातील निभेंरे येथील रहिवासी असून नाव रमेश बन्सी सोनवणे (वय 52) असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान मयत रमेश सोनवणे यांच्या घरची परिस्थिती जेमतेम असल्याने मोलमजुरी करून ते कुटुबांचा उदरनिर्वाह चालवत होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!