Disha Shakti

इतर

गौरी गणपतीतील “आनंदाचा शिधा” त्वरीत वाटप करावा – मच्छिंद्र मंडलिक

Spread the love

दिशाशक्ती प्रतिनिधी /  जावेद शेख : अकोले तालुक्यात महाराष्ट्र शासनातर्फे नागरिकांना गौरी गणपतीत रेशनकार्ड धारकांना आलेला आनंदाचा शिधा त्वरीत वाटप करावा अशी मागणी ग्राहक पंचायत अकोलेचे मच्छिंद्र मंडलिक यांनी केली आहे. अकोल्याचे नायब तहसिलदार लोहरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, अकोले तालुका आदिवासी भाग आहे. ह्या भागात गरीब मोल, मजुरी करणारे, भूमीहीन आदी लोक मोठ्या प्रमाणात राहतात. महाराष्ट्र शासनाकडून आनंदाच्या शिधा मध्ये अल्प दरात तेल, रवा, डाळ, साखर इत्यादी वस्तु मिळतात. मात्र या सर्व घटकांना गणपती विसर्जन होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप बऱ्याच गावांना आनंदाचा शिधा वाटप झालेला नसल्याने अकोल्यातील बऱ्याच गावातील ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली व सांगितले आहे.

महाराष्ट्र शासनाकडून आलेला आनंदाचा शिधा ताबडतोब ग्राहकांना नागरिकांना वाटप करावा अशी मागणी अकोले तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र ने केली आहे. ह्या निवेदनावर मच्छिंद्र मंडलिक , दत्ता शेनकर, रमेश राक्षे, ज्ञानेश पुंडे, राम रुद्रे, दत्ता ताजणे, भाऊसाहेब वाकचौरे, किरण चौधरी, नरेंद्र देशमुख , सुनिल देशमुख, गंगाराम धिंदळे, प्रकाश कोरडे, शारदा शिंगाडे, मंगल मालुंजकर, शोभा दातखिळे, सुदाम मंडलिक, प्रमोद मंडलिक, रामहारी तिकांडे, कैलास तळेकर, रामदास पांडे, राजेंद्र घायवट, राजेंद्र लहामगे, जालिंदर बोडके, धनंजय संत, मोहन मुंढे, गणपत थिगळे, आदिंची नावे आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!