Disha Shakti

इतर

हॉलीवूड इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हलच्या परीक्षकपदी अमोल भगत

Spread the love

दिशाशक्ती प्रतिनिधी / जावेद शेख : ६ व्या हॉलिवूड इंडीपेंड चित्रपट महोत्सवासाठी दिग्दर्शक अमोल भगत यांची एकमताने निवड करण्यात आली असून हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रपट महोत्सवास अमेरिका येथील लॉस एंजेलिस, सीए या ठिकाणी पार पडणार आहे. यासाठी चित्रपट महोत्सवाच्या परिक्षकपदी भारतातून भगत यांची निवड करण्यात आली असून ही बाब देशासाठी व महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे. अमोल भगतचा प्रवास भारतातील अनेक तरुण चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा देणारा आहे. त्याच्या यशामुळे नवोदित कलाकारांना त्यांची आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.

भगत म्हणाले की आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्युरीचा भाग असणे ही एक महत्त्वाची जबाबदारी असते. यात चित्रपट आणि स्क्रिप्ट्सचे समीक्षक मूल्यांकन करणे, पात्र चित्रपटांची निवड करणे हे महत्वाचे काम असते. ज्युरी सदस्य म्हणून चित्रपट निर्मितीबद्दलची सखोल समज असणे आवश्यक असते. चित्रपट निर्मितीच्या दृष्टीकोनातून प्रत्येक कलाकृतीकडे पाहणे आवश्यक असते. त्यासाठी चित्रपटाचा ध्यास मनात असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

रामकुमार शेडगे – जनसंपर्क मिडिया सर्व्हिसेस – 9890775696


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!