Disha Shakti

इतर

स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने राजेगावात दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण संपन्न

Spread the love

इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : ग्रामपंचायत राजेगाव यांच्यावतीने 15 वित्त आयोग निधी अंतर्गत दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण राबविण्यात आले होते हे प्रशिक्षण आयएसओ प्रमाणित स्वर्गीय शंकराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने पार पडले.

या प्रशिक्षणामध्ये गोटा व्यवस्थापन व तांत्रिकीकरण ,जनावरांचे आजार व त्यावर घरगुती उपाय तसेच दूध व्यवस्थापन, जनावरांच्या विष्ठेचे व्यवस्थापन ,द्विदल धान्य किती प्रमाणात दिले पाहिजे, जनावरांना खुराक व चारा किती प्रमाणात दिला पाहिजे इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान केले .तसेच शेतकऱ्यांना शासकीय योजना व विविध प्रकारच्या कर्ज प्रकरणांची माहिती या प्रशिक्षणामध्ये देण्यात आली. 70 प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणामध्ये आपला सहभाग नोंदविला होता.यावेळी प्रशिक्षक वेदांत बोराडे व संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट पाटील यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी विठ्ठल दूध संकलन केंद्राचे अध्यक्ष सोपान काका चोपडे ग्रामसेवक ए.एच.पवणे भाऊसाहेब तंटामुक्ती अध्यक्ष शहाजी गुणवरे पोलीस पाटील महेश लोंढे ,विठ्ठल मोघे, चंद्रकांत मेंगावडे ,अरुण भोई ,सुनील घोगरे , सुजित चोपडे व स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्थेचे सचिव धिरज सोट पाटील उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!