राहुरी प्रतिनीधी / आर.आर.जाधव : नुकत्याच श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टच्या धन्वंतरी रूग्णालय व महाविद्यालय कामगार पतसंस्था, राहुरी फॅक्टरी या कामगार पतसंस्थेची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा ट्रस्टचे अधिक्षक डॉ. बी. आर. पागिरे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या सभासदांनी सभेत सहभाग नोंदविला व मार्गदर्शन केले. सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. पतसंस्थेचे चेअरमन गजानन वराळे म्हणाले, की नर्सिंग होम ट्रस्टचे अध्यक्ष प्रशासकीय अधिकारी दिपक पराये व संस्थेच्या सर्व अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. सर्व संचालक मंडळाच्या वतीने सभासदांना १०% लाभांश जाहीर केला.
संस्थेच्या इतिहासात प्रथमच १०% लाभांश वाटप होणार असल्याने सभासद वर्ग समाधानी आहेत. यावेळी अधिक्षक डॉ. पागिरे, डॉ. बांगर, धोंडे, गागरे, संचालक मंडळातील ज्येष्ठ संचालक डॉ. चेतना कुलकर्णी, डॉ. शेकोकार, विजय डुकरे, प्रा. निलेश जाधव, चव्हाण दत्तात्रय, हिवाळे दत्तात्रय, टिक्कल ज्ञानेश्वर, शोभा ठुबे, गायकवाड विमल, संस्थेचे सचिव बोर्डे जी. डी., माजी चेअरमन भगवानराव म्हसे यांच्यासह अधिकारी व सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन व्हाईस चेअरमन विजय डुकरे यांनी केले. आभार फार्मसी महाविद्यालयाचे उपप्राचार्य धोंडे यांनी मानले.
Leave a reply