इंदापूर प्रतिनीधी / प्रवीण वाघमोडे : पत्नीच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या पतीनेही आत्महत्या करत आयुष्याचा शेवट केलाय. दोनच दिवसांपूर्वी पत्नीचा आजाराने मृत्यू झाला तर आज पतीने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जातीये. मात्र, नियतीच्या या क्रूर खेळात मात्र 7 महिन्यांची चिमुकली पोरकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीच्या मृत्यूने नैराश्य आल्याने तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. स्वप्नील सुतार असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.दोन दिवसांपूर्वी पत्नीचा मृत्यू झाल्याने नैराश्यात गेलेल्या पतीने गळफास घेवून जीवनयात्रा संपवली. ही दुःखद घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथे घडली आहे. डेंग्यू आजाराने पत्नीचा मृत्यू, दोन दिवसांनी पतीनेही गळफास घेत आयुष्य संपवलं आह़े.
याबाबत इंदापूर येथील पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मदनवाडी येथील श्रावणी गोपाळ सुतार (वय वर्ष २०) यांचे डेंग्यूच्या आजारामुळे शुक्रवारी (दिनांक २७) निधन झाले होते. या दुःखद घटनेतून सावरत असतानाच श्रावणी यांचे पती गोपाळ उर्फ स्वप्नील प्रदीप सुतार (वय २४) यांनी रविवार (दिनांक २९ रोजी) दुपारी घरी कुटुंबीयांशी बोलत होते. तेव्हा मला कंटाळा आला आहे. मी जरा आराम करतो, असं सांगून ते खोलीत गेले. पण, ते पुन्हा बाहेर आलेच नाहीत. खोलीत घराच्या छताला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. गोपाळ हे बराच वेळ खोलीतून बाहेर आले नाही. तेव्हा घरच्यांनी जाऊन पाहिलं तर गोपाळ यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचं दिसून आलं. यानंतर घरच्यांनी एकच आक्रोश केला.
याबाबतची फिर्याद गोपाळ यांचा भाऊ संतोष सुतार यांनी भिगवण पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे श्रावणी आणि गोपाळ यांची ७ महिन्यांची दूर्वा हि चिमुकली पोरकी झाली. गोपाळची भिगवण येथे मोबाईल शॉपीचे दुकान होते. या दुख: द घटनेमुळे भिगवण व मदनवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leave a reply