राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दिनांक 26/09/2024 रोजीचे दुपारी 01/45 वाजता चींचाला गावचे शिवारात फिर्यादी नामे सुनील पोपट खीलारी रा.कुरणवाडी तालुका राहुरी यांना तीन आरोपींनी वीट व लाकडी दांड्याने मारहाण करून बळजबरीने दोन लाख रुपये रोख व एक लाख रू किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चैन व पस्तीस हजार रू किमतीची सोन्याची अंगठी काढून घेतल्या बाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर 1043/2024 भारतीय न्याय संहिता कलम119 (1), 118(1), 115(2), 3(5)प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर आरोपी गुन्हा दाखल केल्यापासून गाव सोडून आजपावेतो फरार असल्याने त्यांचा शोध घेत असताना सदर आरोपी हे राहुरी पोलिस स्टेशन हद्दीत आल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पथकामार्फत सदर आरोपी नामे 1)किरण उर्फ सारंगधर तुकाराम जांभुळकर वय 26 वर्ष राहणार वडनेर तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर 2)अभिषेक सटवाजी कोळशे वय 20 रा गडदे आखाडा ता.राहुरी यांना ताब्यात घेऊन त्यांना दिनांक 01/10/2024 रोजी वाजता 00/29 वाजता अटक करून सदर आरोपीची बळजबरीने काढून घेतलेली रोख रक्कम तथा अंगठी जप्त करण्यासाठी व तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी 10 दिवस पोलीस कस्टडी रिमांड ची मागणी मा. न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री सविता गांधले यांनी बाजू मांडून केल्याने माननीय न्यायालयाने 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मा. न्यायालयाने दिल्याने पुढील तपास सुरू आहे.
तसेच एन बी डब्लू वॉरंटातील आरोपी नामे अब्दुल इमाम पठाण रा. अराडगाव यांस पोलीस नाईक संभाजी बडे यांनी सदर वॉरंटात आरोपीस दिनांक 30 9 2024 रोजी अटक करून आज दिनांक 01/10/2024 रोजी माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांस 14 दिवस न्यायालयीन कोठडी दिली आहे. याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की न्यायालयीन समन्स प्राप्त होताच वेळेवर न्यायालयात हजर राहून बी डब्ल्यू अथवा एनबीडब्ल्यू वॉरंट निघणार नाही याची काळजी घ्यावी.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबरमे साहेब, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडखे , पोहेकॉ जानकीराम खेमनर, रामनाथ सानप, संभाजी बडे, जालिंदर साखरे, शकुर सय्यद पोकॉ अविनाश दुधाडे पोकॉ लक्ष्मण खेडकर यांनी केली.
मारहाण करून बळजबरीने दोन लाख रुपये व दोन तोळे वजनाची सोन्याचे चैन व एक अंगठी हिसकवणारे दोन आरोपीस अटक

0Share
Leave a reply