इंदापूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : दिनांक 29/9/24 पोलीस मित्र संघ पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुरेश वाळेकर यांच्या आदेशानुसार व जिल्हा अध्यक्ष अन्सर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील चांदणे शिक्षण MSW राहणार कुर्डूवाडी ता. माढा यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुरेश वाळेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
जिल्हा उपाध्यक्ष पदाचा स्वीकार केल्या नंतर म्हणाले की दिलेली जबाबदारी कायदेशीर व शिस्त प्रिय पद्धतीने करण्याचा प्रामाणिक अवलंब करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन असे मत व्यक्त केले . आपण दिलेली जबाबदारी माझ्या यापूर्वी केलेल्या कामाची पोहोच पावती असून सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम मागील पंधरा वर्षापासून करत असताना सध्या पत्रकार संरक्षण समिती जिल्हा अध्यक्षपदी असून सर्व तालुक्याशी संपर्क आहे.
यामुळे पोलीस मित्र संघात अधिक जोमाने काम करून संघटना बळकटीकरण व वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन असे मत व्यक्त केले यावेळी महाराष्ट्र पोलीस पत्रकार काळे व जाधव है उपस्थित होते. निवडीनंतर पत्रकार बांधव व नागरिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा वर्षाव करून आनंद व्यक्त करण्यात आला.
पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री.सुनील चांदणे यांची निवड

0Share
Leave a reply