दिशाशक्ती प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : दौंड तालुक्यातील राजेगाव येथे रहिवाशी असलेले कु.प्रकाश घोगरे पाटील हे दीड वर्षापासून व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती या कार्यात सहभागी असल्याने त्यांनी अनेक रुग्ण व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त केलेले आहे. त्यांचे असे काम पाहता ०८ जून २०२४ रोजी राहुरी विद्यापीठ येथे दिशाशक्ती मीडिया समूहाने पुरस्कार प्रदान केला. पाटील साहेब हे निर्भिड पत्रकरिता करतात.
समुपदेशन, वर्तमानपत्र, मासिक, सोशल मीडिया आदी माध्यमातून जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे कार्य करण्याचे काम पाटील यांनी केलेले आहे. या कार्याची दखल घेत सयर्थ सोशल फाउंडेशन तर्फे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी समाजात अनेक अपेक्षित घटक असतात यामुळे त्यांच्यात निराश्य येथे आणि हे घटक विविध व्यसनाकडे वळतात व आपले जीवन संपवतात.
मुंबईसारख्या महानगरात अनेक मुले मुलीच्या आहारी गेलेले दिसतात. त्यांचे समूपदेशन व पुनर्वसन करण्याचे मोठे आव्हान होते. मी ते “दिव्य समाज निर्माण संस्था” डॉ. रमेश शितोळे साहेब यांनी भिगवन येथे सुरू केले व त्यांची प्रेरणा घेत प्रकाश पाटील सर यांनी हे व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती कार्य करताना त्यांना यश प्राप्त झाले. समाजाच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी मिळवली व जबाबदारी ही वाढली यामध्ये डॉ. शितोळे साहेबाचे मोलाचे सहकार्य लाभले व या कार्याची दखल घेता समर्थ सोशल फाउंडेशन तर्फे दिनांक २९/९/२०२४ रोजी वार रविवार या दिवशी मधुमेह मुक्ती व व्यसनमुक्ती दूत हा पुरस्कार मिळाला आहे व विशेष म्हणजे आई वडिलांच्या व परिवाराच्या समवेत हा पुरस्कार स्विकारला.
समर्थ सोशल फाउंडेशनतर्फे प्रकाश घोगरे यांना मधुमेह मुक्ती व्यसनमुक्ती दूत हा पुरस्कार प्रदान

0Share
Leave a reply