Disha Shakti

इतर

लाडकी बहीण व भाऊ बेहाल सर्व बँका मालामाल – गजानन पाटील चव्हाण 

Spread the love

नायगाव प्रतिनिधी (नांदेड) / साजीद बागवान : आज दिनांक 01/10/2024 रोजी मा तहसीलदार तहसील कार्यालय नायगाव मार्फत मा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय नांदेड. मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेचे पैसे लाभधारकाच्या अकाउंटला अनुदान जमा होते ते सर्व बँकांमार्फत ते खात्यातून मिनिमम चार्जेस कट करून घेत आहेत ती आट व होल्ड तात्काळ रद्द करावी व कपात केलेले व घेतलेले अनुदान वापस मिळावे व जनधन अकाउंट सुरळीत चालू करून जनरल अकाउंट न करता व मिनिमम चार्जेस न लावता अनुदान लाभधारकाच्या अकाउंटला वापस करणे मिनिमम चार्जेसची अट व होल्ड रद्द करणे असे तक्रारी निवेदन अर्ज सादर करण्यात आले आहे.

तसेच नायगाव सह उमरी धर्माबाद तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्वच बँकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे किमान साडेचार हजार रुपये पर बहिणीला दिलेले अनुदान होते आणि ते आलेले सर्व पैसे अनुदान मिनिमम चार्जेस म्हणून सर्वच बँकांनी कटून घेतलेले आहेत हे चार्जेस व केलेले होल्ड ची आठ तात्काळ रद्द करून सर्व बहिणींना ते अनुदान वापस मिळावेत तसेच केंद्र शासनाने राबवलेली मोहीम जनधन अकाउंट या अकाउंटला जनरल अकाउंट करून बँकानी लाभ धारकाची दिशाभूल करून मिनिमम चार्जेस लावून तुटपंजी लाभधारकाच्या हातात घेत आहेत म्हणून है पैसे अर्थात अनुदान विना विलंब त्यांना देण्यात यावे त्यांच्या अकाउंटला जमा करण्यात यावे.

विशेषता केवायसी मोबाईल लिंक आधार लिंक या सर्व बाबीचा फॉर्म बँकांच्या बाहेर लाईन न थांबवता एकदाच सर्व महिलांचे फॉर्म बँक अधिकाऱ्यांनी कलेक्ट करून केवायसी आणि मोबाईल नंबर लिंक करून घ्यावेत. बँकेने केवाईची टेबल वाड वावेत आणि होणारी माता भगिनींना बांधवांना परेशानी ती तात्काळ थांबवावी तसेच तात्काळ आपल्या स्तरावरून संबंधित सर्व लीड बँक व सर्व बँकांना विनाविलंब आदेशित करावे अशी मागणी करताना उपस्थित नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व नेते गजानन शंकरराव पा चव्हाण किशोर महाराज धर्माबादकर, शिवकांता शिंदे, चंद्रकला मदेवाड, कविता पवार, कलावती सुरणे, मिनाबाई ताटेवाड, पूजा पवार, कलावती पवार, प्रा डी जी पिंपळे मारवाडीकर, रावसाहेब बेलकर, बाबाराव पा भूताळे, साहेबराव गायकवाड, मीना अलसटवार, विठ्ठल बोरीकर, सूर्यकांत सुजलेगावकर, सह नायगाव तालुक्यातील विविध पदाधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!