संगमनेर प्रतिनीधी / गंगासागर पोकळे : भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निदर्शक तत्त्वामधील अनुच्छेद ३९ क व ४१ मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा. समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृद्धपकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळवण्यासाठी राज्याचे सर्व समावेशक धोरण दि. ९ जुलै , २०१८ च्या शासन निर्णयान्वये निर्णमित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार १ ऑक्टोबर हा दिवस राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस ( International day of older person) म्हणून साजरा केला जातो.
श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट माळवाडी बोटा मार्फत मंगळवार ( ता.१ ऑक्टोंबर ) जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस लिंगदेव ता. अकोले येथे साजरा करण्यात आला. यावेळी लिंगदेव गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर राबवण्यात आले.व सत्कार करण्यात आला. आरोग्य शिबिरामध्ये ५४ ज्येष्ट नागरीकांच्या तपासण्या करण्यात आल्या. रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तातील Hb चे प्रमाण, पांढऱ्या पेशी, लाल देशी, पिवळ्या पेशी व इतर रक्त लघवी तपासण्या करण्यात आल्या आणि त्यावर आहार विषयक सल्ला डॉ. राहुल भागवत यांनी दिला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.डी.बी. फापाळे सर हे होते. तसेच अमित घोमल, सदाशिव कानवडे, कानवडे भाऊसाहेब दत्तू कानवडे आदि मान्यवर उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूटचे प्रा.साळुंखे सर यांनी जेष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक सल्ला दिला. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ.शिवाजीराव पोखरकर सर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ.अमित पोखरकर सर यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले, व माळवाडी-बोटा सारख्या ग्रामीण भागामध्ये Engineering / MBA & MCA / Pharmacy / B.B.A B.C.A / B.SC ( Comp / IT ) / P. G.DMLT / Agri & Dairy Diploma या सारखे व्यवसायाभिमुख शिक्षण उपलब्ध असल्याची माहिती ग्रामस्थाना दिली.
यावेळी प्रा.अमोल देशमुख सर, प्रा.सांगळे सर, प्रा.गिरी सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अक्षदा सूर्यवंशी मॅडम यांनी केले. तर आभार प्रा. बाळासाहेब शेळके सर यांनी केले.
श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट माळवाडी – बोटा येथे “१ ऑक्टोंबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस उत्साहात साजरा”….

0Share
Leave a reply