Disha Shakti

कृषी विषयी

छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे मा. मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते शुक्रवारी लोकार्पण

Spread the love

राहुरी विद्यापीठ / आर.आर.जाधव : राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील काष्टी, ता. मालेगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दि. 4 ऑक्टोबर, 2024 रोजी मा. मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.

या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा.ना.श्री. छगन भुजबळ, महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री मा.ना.श्री. गिरीष महाजन, उद्योग मंत्री मा.ना.श्री. उदय सामंत, सार्वजनीक बांधकाम (सार्वजनीक उपक्रम) व रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री मा.ना.श्री. दादाजी भुसे, पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री मा.ना.श्री. गुलाबराव पाटील, राज्याचे कृषि मंत्री तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा.ना.श्री. धनंजय मुंडे, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा.ना.श्री. नरहरी झिरवाळ, कृषि परिषदेचे उपाध्यक्ष मा.ना.श्री. तुषार पवार आणि राज्याच्या कृषि सचिव मा. श्रीमती जयश्री भोज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी दिली.

या लोकार्पण सोहळ्यासाठी मा. खासदार, मा. आमदार, राज्यातील सर्व कृषि विद्यापीठांचे कुलगुरु तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य तसेच कृषि परिषदेचे सदस्य आणि अधिकारी, संचालक उपस्थित राहणार आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!