Disha Shakti

क्राईम

शिर्डीत तरुणावर कोयत्याने वार, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : शिर्डीत मागील गोळीबार प्रकरणाच्या वादातून मंगळवारी दुपारी एकावर कोयत्याने वार झाल्याची घटना घडली असून शिर्डीतील सातत्याने वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. शिर्डीत काही महिन्यापूर्वी मंदिराजवळ पार्किंगमध्ये झालेल्या गोळीबातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती असून भीमनगर भागात भर रस्त्यावर त्याच पार्किंगमधील गोळीबारातील घटनेतील तरुणावर मंगळवारी दुपारी कोयत्याने वार झाल्याची घटना घडली. कोयत्याने वार होत असताना त्याठिकाणी वार होत असलेल्या तरुणाने तेथून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला.

पोलीस घटनेनंतर त्याठिकाणी दाखल झाले मात्र वार करणारे गुन्हेगार तेथून पळून गेल्याने पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. शिर्डीत गुन्हेगारीने डोके वर काढले असून वाढत्या गुन्हेगारीमुळे शिर्डीतील नागरिक हैराण झाले आहेत. शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय बेकायदेशीर दारू विक्री, मटका, सोरट, पत्त्याच्या जुगाराचे क्लब, अवैध गुटखा विक्री, नशेच्या गोळ्यांची विक्री असे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या व्यवसायामुळे शिर्डीतील गुन्हेगारी वाढत आहे. बाहेरील राज्यातील व जिल्ह्यातील अनेक गुन्हेगार शिर्डीत येऊन आश्रय घेतात.

शिर्डीचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे व हलगर्जीपणामुळे शिर्डीत अवैध व्यवसाय वाढले अशी चर्चा होत आहे. शिर्डी गुन्हेगारांचा अड्डा बनले असून याठिकाणी बाहेरील राज्यातील अनेक तडीपार गुंडांना आश्रय मिळतो. गुन्हेगारांना आश्रयाचे, लपण्याचे सेफ्टी ठिकाण शिर्डी झाले आहे. शिर्डी पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी खाकीचा धाक निर्माण करणे गरजेचे आहे. तरच शिर्डीतील वाढती गुन्हेगारी लगाम लागेल.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!