Disha Shakti

क्राईम

खून करून पत्नी घरात बेशुद्ध पडलेली आहे असा बनाव करणाऱ्या आरोपीस राहुरी पोलिसांकडून तात्काळ अटक

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : आज सकाळी 5.20 चे सुमारास इसम नामे केशव श्रीराम लगे हा पोलीस स्टेशनला येऊन हकीकत सांगू लागला की त्याची पत्नी ही त्यांच्या बेडरूम मध्ये बे शुद्ध किंवा मृत अवस्थेत पडलेली आहे. असे कळविल्याने तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टाफने जाऊन खात्री केली असता सौ उर्मिला केशव लगे वय 35 वर्ष ही डोक्यावर जखम झालेली व हात फ्रॅक्चर झालेल्या अवस्थेत मृत झालेली असल्याचे दिसून आले.

मृत महिलेचा भाऊ मयूर कचरू गाडेकर वय 29 वर्ष राहणार माळीचिंचोरा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून मयत बहिण नामे उर्मिला केशव लगे वय 35 वर्ष हिचे सोबत पती केशव लगे याचे नेहमीच भांडण होत होते .
यापूर्वी रक्षाबंधनच्या वेळी तसेच इतरही वेळी झालेले भांडणात नातेवाईकांमार्फत पतीला समज देण्यात आलेली होती. नेहमीच्या होणाऱ्या भांडणातूनच काल रात्री बारा साडेबारा दरम्यान केशव श्रीराम लगे वय 40 वर्ष याने उर्मिला केशव लगे वय 35 वर्ष हिचा गंभीर टनक हत्याराचा वापर करून डोक्याला व शरीरावर ठिकठिकाणी जखमा करून हात फ्रॅक्चर करून खून केला अशा आशयाची तक्रार दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दाखल गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुवर्मे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांचे मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , सहाय्यक पोलीस निरीक्षक सपोनी पिंगळे सपोनी पवार , सपोनि परदेशी, पोलीस उपनिरीक्षक खोंडे ,पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस हवलदार वैराळ, पोलीस हवालदार ठाणगे , पोलीस हवालदार शकुर सय्यद ,डीबी पथकाचे पोलिस हवालदार सुरज गायकवाड, नदीम शेख, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले ,सतीश कुराडे , गोवर्धन कदम, सचिन ताजने, संतोष राठोड ,गणेश लिपणे ,रवी पवार, योगेश आव्हाड, रिजवान शेख महिला पोलीस कॉन्स्टेबल मीना नाचन करत असून आरोपी – पिढीतेचा पती केशव श्रीराम लगे वय 40 वर्ष, राहणार येवले आखाडा यास तात्काळ अटक करण्यात आलेली आहे.

घटनास्थळी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब यांनी भेट दिलेली असून तपासात मार्गदर्शन केलेले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सपोनी परदेशी करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!