Disha Shakti

सामाजिक

शहापूर येथील होम मिनिस्टर कार्यक्रमाचा महिलांनी लुटला मनमुराद आनंद …..

Spread the love

धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : ३ ऑक्टोबर २०२४ रोजी धाराशिव जिल्ह्यातील शहापूर गावात खास महिलांसाठी अशोक जगदाळे आयोजित खेळ रंगला पैठणीचा- होम मिस्टर या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.भावी आमदार म्हणून परिचित असलेले अशोक भाऊ जगदाळे यांच्यातर्फे शहापूर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे (३ ऑक्टोबर) होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला मा. श्री. अशोक जगदाळे यांच्याकडून भेटवस्तू देण्यात आली. तसेच विविध खेळादरम्यान जिंकलेल्या ११ महिलांना आकर्षक बक्षीसे देण्यात आली. घटस्थापना आणि नवरात्र उत्सवाचे औचित्य साधत महिलांना दैनंदिन जीवनातून स्वतःसाठी वेळ काढत मनसोक्त जगता यावं म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदा सर्वकाळ पाठीशी असणाऱ्या आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने कार्यक्रमाची सुरवात झाली. या कार्यक्रमात माधुरी जगताप, अंकिता यादव या पैठणीच्या मानकरी ठरल्या. कार्यक्रमाच्या मध्यावर सहभागी झालेल्या बंजारा भगिनींनी पारंपारिक वेशभूषा करत नृत्य सादर केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल महिलांनी अशोक भाऊंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाला सौ. आशाताई जगदाळे, माजी नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे, माजी सरपंच उर्मिला घोराडे , ग्रा. प. सदस्य पूजा मोरे, सुरय्या पटेल, वाघदरी गावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर वाघदरी, समाजसेवक नामदेव यादव, सामाजिक कार्यकर्ते देविदास नागणे, शिवसेना शाखा अध्यक्ष आप्पा मिटकर, केशेगावचे माजी सरपंच कल्याण पाटु तसेच नितीन कासार ( माजी नगराध्यक्ष, नळदुर्ग), कमलाकर काका चव्हाण (शिवसेना उपजिल्हा प्रमुख, धाराशिव) ताजुद्दीन सय्यद सावकार उपस्थित होते. शहापूर आणि आजूबाजूच्या इतर गावातील महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभाग नोंदवला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!