दिशाशक्ती प्रतिनीधी / ज्ञानेश्वर सुरशे : मान्य न्यायालयात चालू असलेल्या खटल्यामध्ये समन्स बजावूनही हजर न राहिलेल्या आरोपींविरुद्ध मान्य न्यायालयाने बेलेबल वॉरंट काढलेले होते. तरीसुद्धा मान्य न्यायालयात हजार न राहिलेल्या आरोपींना विरुद्ध माननीय न्यायालयाने जामीन पात्र वॉरंट काढल्याने राहुरी पोलिसांनी वॉरंटमधील आरोपी नामे
1अमित नामदेव तुपे , वय 36 वर्ष राहणार कोल्हार तालुका राहुरी
2 सचिन उर्फ सतीश राजेंद्र भालेराव वय 35 वर्ष राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी
यांना आज दिनांक ४/१०/२०२४ रोजी अटक करून मान्य न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी क्रमांक 1 यास 4 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व आरोपी क्रमांक 2 यास सहा दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक वैभव साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात पोलीस हेडकॉन्स्टेबल जायभाये पोलीस नाईक गणेश सानप यांनी केली.
तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या कोर्टात काही केसेस चालू असल्यास आपण तारखेवर हजर राहावे जेणेकरून वॉरंट निघणार नाही व अटक होऊन जेल रवानगी होणार नाही.
आ – जामीन पात्र वॉरंटमधील दोन आरोपीस राहुरी पोलिसांकडून अटक, 6 दिवस न्यायालयीन कोठडी

0Share
Leave a reply