Disha Shakti

सामाजिक

श्रीक्षेत्र विठ्ठलेश्वर मंदिर कासराळी ते श्रीक्षेत्र भगवान बालाजी मंदिर नरसी पदयात्रा भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद

Spread the love

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : बिलोली तालुक्यातील कासराळी येथुन श्री विठ्ठलेश्वर मंदिर ते भगवान बालाजी मंदिर नरसी पदयात्रा निघाली. नवरात्र उत्सवानिमित्त भगवान बालाजी मंदिर नरसी येथे नऊ दिवस विविध धार्मिक विधी संपन्न होत असतात नवरात्रीमध्ये होणाऱ्या या उत्सवाचा आनंद सर्व गावकऱ्यांना घेता यावा या हेतूने गावातील तरुण व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या कल्पनेतून श्री विठ्ठलेश्वर मंदिर कासराळी ते श्री भगवान बालाजी मंदिर नरसी पर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेमध्ये पहाटे पाच वाजता श्री विठ्ठलाची आरती करून कासराळी येथून पदयात्रा मार्गस्थ झाली.

पाचपिंपळी ग्रामस्थांच्या वतीने चहापान पार पडला तसेच लोहगांव येथे चहापान व फराळाची व्यवस्था ग्रामस्थांच्या करण्यात आले होते. या पदयात्रा मध्ये फुगडी व पावले खेळत व्यंकट रमणा गोविंदाचा जयघोष करत सर्व भाविकांनी नरसीच्या दिशेने प्रस्थान केले. यामध्ये गावातील प्रतिष्ठित व्यक्ती भाविकभक्त, महिला भगिंनी व तरुणांचा प्रचंड सहभाग होता. याप्रसंगी तरुणांचा उत्साह या पदयात्रेमध्ये विशेष पहावयास मिळाला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!