Disha Shakti

क्राईम

अकोले तालुका दुहेरी हत्याकांडाने हादरला; अकोले तालुक्यात भरदिवसा दिराने दोन भावजायांचा धारदार शस्त्राने केला निर्घुण खून

Spread the love

जिल्हा प्रतिनिधी / वसंत रांधवण : अकोले तालुक्यातील पठार भागात बेलापूर गावात भर वस्तीत एका माथेफिरू दिराने किरकोळ जमिनीच्या व पैशाच्या वादातून दोन भावजायांचा धारदार कोयत्याच्या सहायाने निर्घुण खून केल्याची घटना घडली आहे.वाटाघाटीच्या वादात दिराने आई समोरच दोन भावजयांवर कोयत्याने सपासप वार करून हत्या केली आहे. तर जाऊबाईला वाचवण्यासाठी आलेल्या महिलेच्याही अंगावर कोयत्याने वार करत तिचीही निर्दयी पने हत्या करण्यात आली,

अकोले तालुक्यातील बेलापूर याठिकाणी आज दुपारच्या सुमारास हि हृदयद्रावक घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.उज्वला अशोक फापाळे (वय ३५), आणि त्यांची जावबाई वैशाली संदीप फापाळे (वय ४०) असे या हत्याकांडातील मृत महिलांची नावे आहेत. पोलिसांना माहिती मिळताच अकोले पोलिस घटनास्थळी पोहचले असून पंचानामा केला आहे, हाती आलेल्या माहिती नुसार मयत उज्वला यांच्या पतिचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते, यानंतर उज्वला फापाळे ही कामानिमित्त चाकण या ठिकाणी राहत होती, शेतातील सोयाबीन काढण्यासाठी उज्वला ही घरी आली त्याचेवळी तिचा दिर आरोपी दत्तात्रय फापाळे हा भावजयला म्हणाला’ तुझ्या पतीसाठी मी खर्च केला आहे, ते पैसे माझे देऊन टाक’ तसेच शेतीच्या वादातून त्यांच्यात वाद वाढला. आणि आरोपीने कोयत्याने भावजय वर सपासप वार करत तिचा खून केला आहे.

यावेळी मोठा आरडाओरडा झाल्याने भावकीतील वैशाली फापाळे ही महिला उज्वला हीला वाचवण्यासाठी मध्ये पडल्याने आरोपीने वैशालीवर देखिल कोयत्याने वार करून त्या दोघींचीही हत्या केली आहे. उज्वला हीला दोन लहान मुले आहेत, मुलांना तिने माहेरी ठेवले होते, त्यामुळं उज्वलाचे दोन लहान मुलं वाचली आहेत, मात्र भांडण सोडवायलामध्ये पडलेल्या वैशाली फापाळे यांना देखिल आपला जीव गमवावा लागला आहे.

आरोपी दत्तात्रय फापाळे हा दुहेरी हत्याकांड करून पसार झाला असून हातात कोयता घेऊन जातानाचा त्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहे. पुढील तपास अकोले पोलीस निरीक्षक मोहन बोरसे हे करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!