Disha Shakti

इतर

राहुरीच्या देवी भक्तांवर काळाचा घाला ; सत्तरमाळ घाटात भीषण अपघात, गुलदगड दाम्पत्य जागीच ठार

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी येथील भाविक माहूर येथे रेणुकामातेचे दर्शन करून परतत असतांना कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात राहुरी येथील दाम्पत्याचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना आज दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे सहा वाजेदरम्यान पुसद ते वाशिम मार्गावरील सत्तरमाळ घाटात घडली आहे. सविस्तर माहिती अशी की, राहुरी येथून दहा भाविक तवेरा कारने (MH 16 AJ 6010) ने रेणुकादेवीच्या दर्शनासाठी माहूरला गेले होते. सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान वाशिममार्गे पुसदकडे येत असतांना सत्तरमाळ घाटात चालकाला डुलकी लागल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सागाच्या झाडावर आदळले. हा अपघात एवढा भीषण होता की, दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर चालकासह आठजण गंभीर जखमी झाले.

या भीषण अपघातात वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या अपघातात मनीषा बबन गुलदगड (वय 50), बबन किसन गुलदगड (वय 55, दोघेही रा. राहुरी, जि. अहिल्यानगर) हे दाम्पत्य जागीच ठार झाले तर कार चालक मुकुंद दत्तात्रय लांडे (वय 49), मयूर सुरेश रोकोळे (वय 25), सागर शाळाहारी सरोदे (वय 25), किरण भैरव बोरुडे (वय 30), सारिका गोरख सुडके (वय 40), मंदा बाबू गडकळ (वय 50), सार्थक संतोष बोरुडे (वय 13), संतोष लक्ष्मण बोरुडे (वय 40) सर्व रा. राहुरी, जि. अहिल्यानगर अशी जखमींची नावे आहेत. अपघात झाल्यानंतर जखमींना मदतीसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. याप्रकरणी चालक मुकुंद लांडे (रा. सुडकेमळा, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सर्व जखमींना वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याचे समजते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!