Disha Shakti

क्राईम

श्रीरामपूर शहर पोलिसांनी कोणत्याही पुराव्याशिवाय लावला गुन्ह्याचा शोध ; नांदूर खुर्द येथील हत्येतील आरोपी जेरबंद

Spread the love

श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डी येथे जाण्यासाठी एका जीपचालकाने नांदेड येथील व्यक्तीला लिफ्ट दिली. प्रवासादरम्यान चांगली ओळख झाल्याने दोघेही नेवासे परिसरात दोन वेळा दारू प्यायले. मात्र, श्रीरामपूरजवळ येताच त्यांच्यात वाद होऊन प्रकरण थेट खुनापर्यंत गेले. श्रीरामपूर शहर पोलिसांनी प्रथमदर्शनी कोणत्याही पुराव्याशिवाय गुन्ह्याचा छडा लावत जीप चालकाला जेरबंद केले आहे.

श्रीरामपूर राहाता तालुक्याच्या हद्दीवर नांदूर परिसरामध्ये ४ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान पोलिसांना एक मृतदेह सापडला होता. मृतदेहावर काही जखमेच्या खुणा होत्या. पोलिसांना खिशातील मोबाइलवरून मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले होते. त्यावरून मयत व्यक्ती हा नितेश आदिनाथ मैलारे (वय २८, रा. पोखंडेवाडी, ता. मुखेड, जि.नांदेड) असल्याचे समजले.पोलिसांनी याप्रकरणी केलवड (ता. राहाता) येथील ऋषिकेश देवण्णा बरबट (वय २५) या जीप चालकाला अटक केली आहे. मयत नितेश मैलारे हा छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डीला जाण्यासाठी आलेला होता. तेथे तो वाहनांची वाट पाहत उभा होता. त्याच वेळी बरबट हा त्याच्या जीपमधून चालला होता.

त्याने मैलारे याला आपल्या जीपमध्ये बसवले. दोघांमध्ये प्रवासामध्ये चांगली ओळख झाली. नेवासे परिसरामध्ये रस्त्यात गाडी थांबवून ते दोन वेळा दारू पिले. त्याच्यात मैत्रीचे संभाषण सुरू सुरू झाले. श्रीरामपूरजवळ येताच त्यांच्यात खटके उडाले. वादावादी सुरू झाली. गाडीतच त्यांच्यात भांडण झाले. श्रीरामपूर शहर ओलांडताच जीप चालक बरबट याने वाहनातील टॉमीने मैलारे याच्यावर वार केला. यात मैलारे हा गंभीर जखमी झाला. बरबट याने त्याला रिक्षातून ढकलून दिले. त्यानंतर तो केलवड येथे घरी पोहोचला.
फोन कॉल्सची माहिती आली समोर पोलिसांनी मयत मैलारे याच्या फोन कॉल्सची माहिती घेतली. आपण वैष्णोदेवीला जाणार असून दसऱ्याला घरी येणार, असे त्याने आईला सांगितले होते. मात्र या दरम्यान ही घटना घडली. पोलिसांसमोर खुनाच्या घटनेची उकल करण्याचे मोठे आव्हान होते. मात्र त्यात त्यांना यश आले. आरोपी बरबट याने खुनाची कबुली दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!