Disha Shakti

राजकीय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समवेत महाराष्ट्रातील विविध पदाधिकारी यांची बैठक संपन्न

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : राज ठाकरे मनसे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व मनसे नेते अविनाश अभ्यंकर,मनसे नेते अनिल शिदोरे व नगर जिल्हा निरीक्षक सतीश नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे नुकतीच बैठक पार पडली.याप्रसंगी अहिल्यानगर जिल्ह्यातील मनसे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांची बैठक पार पडली.

याप्रसंगी मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे म्हणाले की, नगर जिल्ह्यातील सर्व विधानसभामध्ये आपले उमेदवार देऊन पूर्ण ताकतीने निवडणूक लढवावे व काही दिवसाने नगर जिल्ह्यात जाहीर सभा देखील घेईल असे मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे म्हणाले.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे,जिल्हाध्यक्ष सचिन डफळ,जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, या तिन्ही जिल्हाध्यक्षांनी राज ठाकरे व मनसेचे नेते व निरीक्षक यांना सांगितले की नगर जिल्ह्यातील सर्व १२ विधानसभा मध्ये सक्षम व चांगल्या प्रतिमेचे उमेदवार देऊन त्यांच्यासाठी अहोरात्र काम करून प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू व यावेळेस नगर जिल्ह्यातून मनसेचा उमेदवार निवडून आणून नगर जिल्ह्यामध्ये मनसेचा झेंडा फडकवणारच असे आश्वासन मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले.

याप्रसंगी श्रीरामपूर मनसे तालुकाध्यक्ष डॉ.संजय नवथर, मनसे शहर अध्यक्ष सतीश कुदळे, उपजिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नेवासा तालुकाध्यक्ष दिगंबर पवार, संगमनेर तालुकाध्यक्ष दिपक वरपे, शहर अध्यक्ष तुषार ठाकुर, राहाता तालुका अध्यक्ष गणेश जाधव, शहर अध्यक्ष विजय मोगले,कोपरगांव शहर अध्यक्ष सतिश काकडे, अकोले तालुकाध्यक्ष दत्ता नवले, उपजिल्हाध्यक्ष हेमंत दराडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे,आदी नगर जिल्ह्यातील सर्व उपजिअध्यक्ष,तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष याप्रसंगी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!