विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या टाकळीढोकेश्वर ग्रामपंचायतच्या खासदार निलेश लंके गटाच्या महिला सरपंच अरुणा प्रदिप खिलारी विराजमान आहेत. मात्र यांच्या विरोधात सोमवार दि.७ ऑक्टोबर रोजी तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्याकडे केवळ ११ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. ग्रामपंचायतीत सत्ताधारी व विरोधक गटाने एकत्र येत अविश्वास ठराव दाखल केल्याने टाकळीढोकेश्वर येथिल राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता? या ठरावाच्या विरोधात चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे. त्याच दिवशी सायंकाळी अविश्वासाच्या ठरावाने आनंदही मोठ्या दिमाखात फटाके वाजवून साजरा केल्याचे चित्र टाकळी ढोकेश्वर परिसरात पाहायला मिळालं १५ पैकी ११ ग्रामपंचायत सदस्य सरपंचांविरोधात आहेत. परंतु ठराव पास होण्यासाठी १२ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक असल्याने विरोधकांच्या एका सदस्याची भूमिका ही अजूनही गुलदस्त्यात असून अस्पष्ट असल्याची माहिती समोर आली आहे.
इतकेच नाही तर सरपंच अरुणा खिलारी यांचे पती प्रदिपकुमार खिलारी हे खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक असून ते निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत.
१५ पैकी केवळ ११ ग्रामपंचायत सदस्यांनी हा अविश्वास ठराव दाखल केला. त्यामुळे खासदार निलेश लंके गटाचे सरपंच असल्याने त्या राजीनामा देतात की, अविश्वास ठरावाला सामोरे जातात, याकडेही पारनेर तालुक्यासह टाकळीढोकेश्वर ग्रामस्थांचे लक्ष जरी लागले असले तरी सध्याच्या परिस्थितीत सत्ताधारी व विरोधक अविश्वासाचा ठराव तत्परतेने मंजूर करतात की अजून काही उलथापालथ होईल ? हे पाहणं यानिमित्ताने महत्त्वाचे ठरणार आहे.दि. ११ ऑक्टोबरला ग्रामपंचायतमध्ये विशेष सभा
टाकळीढोकेश्वर ग्रामपंचायतीच्या सरपंच अरुणा खिलारी यांच्यावर ग्रामपंचायतीच्या ११ सदस्यांनी सोमवारी अविश्वास ठराव दाखल केला आहे. दुसरीकडे या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी शुक्रवार दि ११ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन केले आहे. त्यामुळे येत्या ११ तारखेला अविश्वास ठराव संमत होतो का फेटाळला जातो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
टाकळीढोकेश्वरच्या सरपंचांविरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर होण्याआधीच फटाके वाजवून आनंद साजरा ! अविश्वास ठराव बारगळण्याची शक्यता ?

0Share
Leave a reply