Disha Shakti

कृषी विषयी

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला आले यश, कुलगुरुंच्या हस्ते नारळपाणी घेवून सुटले उपोषण

Spread the love

राहुरी विद्यापीठ / आर.आर. जाधव : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे दि. 3 ऑक्टोबर, 2024 पासून सुरु असलेले प्रकल्पग्रस्तांचे उपोषण आज कलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते प्रकल्पग्रस्त कृति समितीचे सचिव श्री. सम्राट लांडगे, श्री. नारायण माने, श्री. प्रविण थोरात यांना नारळपाणी देवून सोडण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे, राहुरीचे नायब तहसीलदार श्री. सोपान बाचकर, तलाठी श्री. विकास शिंदे उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी वेळोवेळी सरकारदरबारी सकारात्मक पाठपुरावा केला.

आज सकाळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देवून तेथून मोबाईलद्वारे मंत्रालयात प्रकल्पग्रस्तांच्या भरतीसंदर्भातील मागणीचा पाठपुरावा केला. त्यानंतर पूर्वनियोजीत असलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य झाल्या. त्याबद्दल प्रकल्पग्रस्तांनी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे आभार मानले. महात्मा फुले कृषि विद्यापीठात ज्या ज्या शेतकर्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकरी कुटुंबातील सदस्याला विद्यापीठामध्ये नोकरी देणे अशी तरतुद आहे. प्रकल्पग्रस्तांनी बरेच वर्ष संघर्ष करुन सन 2009 ला पहिली भरती झाली. यामध्ये 584 खातेदार होते. त्यानंतर 2009 ला 392 सदस्यांची प्रकल्पग्रस्त म्हणुन भरती झाली व 229 खातेदार हे भरतीतून वंचीत राहिले. पुन्हा 2009 पासून ते 2024 पर्यंत विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांनी संघर्ष सुरु ठेवला.

या संघर्षासाठी प्रकल्पग्रस्त मा. सुप्रीम कोर्टात गेले व मा. सुप्रीम कोर्टाने मा. उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून महाराष्ट्र पुर्नवसन अधिनियम 1999 च्या अधिन राहुन प्रकल्पग्रस्तांनी भरती करण्याचा आदेश सरकारला दिला. सरकारने या संघर्षाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य केल्या व तसा कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला. याबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांनी महसूल मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील, कृषि मंत्री ना.श्री. धनंजय मुंडे आणि कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे आभार व्यक्त केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!