इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सन्मान सोहळ्यानिमित्त विविध पुरस्काराचे वितरण केडगाव चौफुला ता. दौंड येथे करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी वकील ,डॉक्टर, पत्रकार, दिंडी चालक, दिव्यांग व्यक्ती, आशा सेविका, सेवानिवृत्त स्वातंत्र्य सैनिक, शिक्षक, ह.भ.प. महाराज इत्यादी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम व संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले, त्यानिमित्त रक्तदान शिबिर, मोफत चष्मे वाटप , विविध आजारावरील मोफत तपासण्या इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवरांचे मनोगत व शेवटी अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला.
सुधीर लोखंडे यांना श्री.राजाभाऊ तांबे प्रतिष्ठानतर्फे इंदापूर तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान

0Share
Leave a reply