दिशाशक्ती न्यूज नेटवर्क मुंबई : पत्रकार, साहित्यिक, गीतकार, सामाजिक कार्यकर्ता, भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांना त्यांच्या वाढदिवशीच 8 आक्टोंबर ला दिशा शक्ती मिडिया समुहाचा राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार अड.वैभव गरगडे (उच्च न्यायालय मुंबई) यांनी हा पुरस्कार भारत कवितके यांना देऊन सन्मानित केले.मंगळवार दिनांक 8 आक्टोंबर रोजी मुंबई कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था चे कार्यालय मध्ये या संस्थेचे विद्यमान महासचिव भारत कवितके यांचा वाढदिवस संस्थेचे पदाधिकारी सभासद सदस्य व रहिवासी बांधव यांनी मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा केला.जून 2024 मध्ये दिशा शक्ती मिडिया समुहाचा विद्यमान महासचिव भारत कवितके यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
तसे दिशा शक्ती मिडिया समुहाचे कार्यकारी संपादक आयोजक रमेश खेमनर यांनी जाहीर केले होते.भारत कवितके यांना सदर पुरस्कार मुंबई कांदिवली पश्चिम या ठिकाणी दिला.व दिशा शक्ती मिडिया समुहाचे अड वैभव गरगडे यांनी भारत कवितके यांना शुभेच्छा दिल्या.या वेळी श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था चे मुख्य प्रवर्तक विजय पाल यांनी भारत कवितके यांना शुभेच्छा दिल्या.व भारत कवितके यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. या प्रसंगी अड वैभव गरगडे, विजय पाल,यांचे भारत कवितके यांनी आभार मानले.
यावेळी एस.आर.ए.विकासकांचे व्यवस्थापक रियाज सर, कुमार सुगावे, गोपाळ घाग, दशरथ गरगडे, प्रेम शंकर सागर वर्मा,दिवान सिंह,अमोद पाल, प्रभात पाल, संजय कुंभार, उदयराज ऊ, अच्छेलाल यादव,जयंत पाल, आनंदा आमटे, प्रेम भाई, संजय सूर्यवंशी, आफताब अन्सारी, बालाजी सूर्यवंशी व इतर संस्थेचे पदाधिकारी सभासद सदस्य व रहिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
भारत कवितके यांना वाढदिवसाच्या दिवशीच दिशाशक्ती मिडिया समुहाचा राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान

0Share
Leave a reply