इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित विठ्ठलराव थोरात इंग्लिश मेडियम स्कूल भिगवण याठिकाणी शारदीय नवरात्रौत्सव निमित्ताने महाभोंडला साजरा करण्यात आला आपली परंपरा, सांस्कृतीक सण उत्सवाची विद्यार्थ्यांना माहिती मिळावी म्हणून आज विठ्ठलराव थोरात इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी हस्त व नवदुर्गांचे पूजन संस्थेच्या संचालिका सुशिला थोरात, संचालिका संगीताई थोरात, सुनिताताई थोरात,पूजा थोरात, सोनाली थोरात यांनी पूजन व आरती करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी हादग्याची एक लिंबू झेलू बाई,ऐलमा,पैलमा गणेश देवा,अक्कण माती चिक्कण माती अशी गाणी म्हणाली.सर्व विद्यार्थी-विद्यार्थींनीनी महिला शिक्षकांनी वेगवेगळ्या गाण्यावर दांडिया,गरबा खेळून कार्यक्रमाचा आनंद लुटला.या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या प्राचार्या वंदना थोरात व सर्व शिक्षकवृंद यांनी संस्थेचे अध्यक्ष बापूराव थोरात, सचिव विजयभैय्या थोरात यांच्या मार्गदर्शनखाली आयोजन करण्यात आले.
राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित विठ्ठलराव थोरात इंग्लिश मेडियम स्कूल भिगवण येथे महाभोंडला उत्साहात

0Share
Leave a reply