दिशाशक्ती प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : पे टू पे सोशियल फाउंडेशन मानसरोवर जयपुर संस्थापक श्री प्रभू दयाल शर्मा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार व अनुराधा शर्मा नॅशनल ऑडिट ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 6 ऑक्टोंबर ते 9 ऑक्टोंबर 2024 तीन दिवसीय राष्ट्रीय एज्युकेशनल मीटिंग नेचर रेस्टॉरंट पुष्कर राजस्थान या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार गुजरात ,महाराष्ट्र लातूर, सोलापूर ,नांदेड धाराशिव परभणी वाशिम, कोल्हापूर या ठिकाणाहून सामाजिक कार्यकर्ते, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेटूपे सोशल फाउंडेशनच्या बेटी बचाव, बेटी पढाओ उद्देशानुसार केंद्र सरकार मान्यता प्राप्त निती आयोग माध्यमातून महिला सबलीकरण, व्यवसाय प्रशिक्षण, वृक्षारोपण, वृद्धाश्रम अनाथ मुलींना लग्नात अर्थ सहाय्य, मुलीचा जन्म व कन्यादान अर्थसहाय्य, गोमाता पशुधन योजना इत्यादी योजने अंतर्गत सामाजिक कार्य करत देश सेवा, स्वावलंबी करण्याच्या हेतूने. ना नफा ना तोटा या तत्त्वावर दान स्वरूपातील अर्थसाह्य घेऊन सामाजिक कार्य करण्यासाठी मान्यताप्राप्त पे टू पे सोशल फाउंडेशन परिपूर्ण 14 प्रकारची सर्टिफिकेट घेऊन कार्य करीत आहे.
समाजसेवकाची भूमिका व उद्देश घेऊन कशाप्रकारे कार्य करावे या सामाजिक गैरसमजुती, ध्येय उद्दिष्ट व दिशा व दशा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. देशातील महिला व पुरुष यांना व्यवसाय निर्मिती करून सर्वांनी एकत्र येऊन नवीन काहीतरी करूया गरजवंतांचे भविष्य घडवूया याप्रमाणे समाजसेवा कार्य करावे. या उद्देशाने हे प्रशिक्षण पार पडले. याप्रसंगी विजय वाघमारे, विष्णू बनसोडे ,माधव सावंत कडूबा जाधव, दयानंद राठोड, उमेश वाघमारे सुनील चांदणे अंकुश वाघमारे ,प्रशांत शेटे गणेश काळबांडे, वनिता शेंडगे इत्यादी महाराष्ट्र मधून उपस्थित होते
Leave a reply