Disha Shakti

कृषी विषयीशिक्षण विषयी

हाळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे मा. कृषि मंत्र्यांच्या शुभहस्ते रविवारी लोकार्पण

Spread the love

राहुरी विद्यापीठ / आर.आर.जाधव : राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील हाळगाव, ता. जामखेड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा रविवार दि. 13 ऑक्टोबर, 2024 रोजी मा. कृषिमंत्री मा.ना.श्री. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. हा कार्यक्रम महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

यावेळी शिर्डी लोकसभा सदस्य मा. खा. श्री. भाऊसाहेब वाकचौरे, अहिल्यानगरचे लोकसभा सदस्य मा. खा. श्री. निलेश लंके, मा. आ. श्री. किशोर दराडे, मा. आ. प्रा. राम शिंदे, मा. आ. श्री. सत्यजित तांबे, मा. आ. श्री. शिवाजीराव गर्जे, मा. आ. श्री. बाळासाहेब थोरात, मा. आ. श्री. बबनराव पाचपुते, मा. आ. श्री. शंकरराव गडाख, मा. आ. श्रीमती मोनिका राजळे, मा. आ. श्री. संग्राम जगताप, मा. आ. श्री. आशुतोष काळे, मा. आ. श्री. प्राजक्त तनपुरे, मा. आ. श्री. किरण लहामटे, मा. आ. श्री. लहू कानडे, मा. आ. श्री. रोहित पवार, मा. आ.तसेच कृषी परिषदेच्या सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रकाश आबिटकर, मा. आ. श्री. चिमणराव पाटील व कृषि परिषदेचे उपाध्यक्ष मा. ना. श्री. तुषार पवार यांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमासाठी मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, राज्याच्या कृषि सचिव मा. श्रीमती जयश्री भोज, कृषि परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी दिली. या लोकार्पण सोहळ्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य तसेच कृषि परिषदेचे सदस्य, जिल्हाधिकारी श्री. सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला आणि अधिकारी, संचालक उपस्थित राहणार आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!