राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दि 12 10 2024 रोजी गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाल्याने एक इसम त्याच्या ताब्यातील छोटे हत्ती वाहनांमधून गोमांस घेऊन राहुरी कडे येत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पो नि संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर ते मनमाड जाणारी रोड वर हॉटेल साई पंचवटी समोर राहुरी कारखाना येथे नमूद बातमीतील हकीकतीप्रमाणे सापळा लावून छोटा हत्ती एम एच १६ ए वाय 752 यास पकडून खात्री केली असता त्यामध्ये दीडशे किलो वजनाचे गोमांस आढळून आले तसेच आरोपी नामे मुस्ताक शेती कुरेशी वय 20 वर्ष रा.ममदापूर ता.राहता अहमदनगर या ताब्यात घेऊन राहुरी पोस्टे येथे आणले आहे सदर बाबत राहुरी पोस्ट येथे पो का सतीश संजय कुराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 22500/- रुपये किमतीचे गोमांस तसेच 300000 रुपये किमतीची एक छोटा हत्ती टाटा एस गाडी जप्त करण्यात आलेली आहे .पुढील तपास पोहेका शेळके करीत आहेत.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबरमे साहेब, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोहे का सुरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे सतीश कुराडे नदीम पठाण यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ यादव करीत आहेत.
Leave a reply