विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : तालुक्यातील सन 1950 पासून ग्रामपंचायत कर्मचारी हे ग्रामपंचायत मध्ये विविध पदावर काम करतात. व गावातील तळागाळातील मुख्य कर्मचारी म्हणून ओळखला जातो.शासनाच्या विविध योजना कार्यन्वित करण्याचे काम करत असतो.याकडे शासनाने दिलेल्या आदेशाचे खालील स्तरावर दुर्लक्ष केले जात आहे.ते म्हणजेच पंचायत समिती, पारनेर यांना मा.उप मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प अहमदनगर. यांनी लेखी आदेश करतात परंतु गटविकास अधिकारी, हे सदर आदेशाचे पालन करत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी यांचे आर्थिक व पदावर काम करताना नुकसान झालेले आहे.वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा येथील विस्तार अधिकारी पत्राची दखल घेत नाहीत.
ग्रामसेवक हे गावात 1 ते 2 दिवस हजर असतात त्यांनी पाठीशी घालण्याचे काम विस्तार अधिकारी करत आहेत.त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांचे आदेश कचरा कुंडीत टाकल्याप्रमाणे, काम चालू आहे.वेळोवेळी आदेश येऊन सुद्धा त्याकडे जाणून बुजून हे अधिकारी, लक्ष देत नाहीत.तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन वेळेत करण्याचे काम ग्रामसेवकांचे आहे, परंतु हे काम तालुका मॅनेजर BM हे करतात. त्यावर गटविकास अधिकारी, यांचे नियंत्रण नाही.
याबाबत जि.परिषद ला ग्रा.प कर्मचारी बाबत चुकीची माहिती पुरवली जाती.जि.प. ने दि. 30/08/2024 ला आदेश करून देखील खालील स्तरावर पालन झालेले नाही.यामुळे पारनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी हळहळ व्यक्त करत असून सोमवार दिनांक 14/10/2024 रोजी असंख्य कर्मचारी पंचायत समिती पारनेर, यांच्या मनमानी कारभारा विरुद्ध बोंबाबोंब आंदोलन करणार आहेत
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ह्या आहेत मागण्या
1) दि.16/07/2024 चे तक्रारी निवारण न झालेबाबत.
2) शासकीय पंच म्हणून नेमणूक न करणे.
घंटागाडी, वर वाहन चालक, म्हणून वेगळा कर्मचारी ठेवण्यात यावा.
3) ग्रामपंचायत कर्मचारी सेवा पुस्तक भरणे व विमा कवच उतरवणे.
ग्रामपंचायत कर्मचारी 25%,50%, 75% टक्के ग्रामपंचायत हिस्सा वेळेत मिळणे,राहणीमान भत्ता वेळेत देणे,भविष्य निर्वाह निधी वेळेत जमा करणे.
4) नाहक कर्मचाऱ्याला राजकीय हेतुने त्रास देणे. ह्या आमच्या स्थानिक मागण्या आहेत.
ग्रामपंचायत कर्मचारी 4511 संघटना यांचे बोंबाबोंब आंदोलना चे नेतृत्व राज्याचे उपाध्यक्ष श्री डिके साहेब, जिल्हा सचिव श्री घुणे साहेब, जिल्हा संघटक श्री.मनिष वैराळ, जिल्हा उपाध्यक्ष श्री गणेश ईधाटे हे करणार आहे.अशी माहिती तालुका अध्यक्ष श्री.शब्बीर भाई शेख ,तालुका सचिव श्री.लखन आल्हाट तसेच तालुका मार्गदर्शन श्री.शशिकांत साळवे, दयांनद खेनंट,कार्याध्यक्ष गणेश गुंजाळ, उपाध्यक्ष सुरेश बेलकर,सचिन केदार संघटक रावसाहेब गागरे व किरण शिंदे व तालुका कार्यकारिणी पधादिकारी सदस्य इ.तरी तालुक्यातील कर्मचारी बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
पारनेर पंचायत समितीच्या मनमानी कारभारा विरोधात ग्रामपंचायत कर्मचारी संघटना करणार बोंबाबोंब आंदोलन

0Share
Leave a reply