अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे मिसाईल मॅन,माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि.१५) श्री श्री गुरुकुल येथे विविध जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी व विभागीय स्पर्धेत विजेत्या झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे हे होते तर यावेळी संचालिका डॉ रूपाली कानडे मुख्याध्यापक लक्ष्मण नरे, मुख्याध्यापक शिवराज भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रेयस मुळे लातूर विभागात चौथा क्रमांक मिळवीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र, समृद्धी माळी, फातिमा शेख, अर्णव कानडे यांनी विभागीय योगासने स्पर्धेत सहभागी. शुभांगी ढाले जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा सहभाग, समृद्धी माळी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा सहभाग, ऋतुजा गायकवाड थाळी फेक स्पर्धा जिल्हास्तरीय सहभाग, आर्णा कानडे जिल्हा स्तरीय २०० मीटर धावणे सहभागी.
यावेळी बोलताना डॉ जितेंद्र कानडे म्हणाले की, अभ्यासासोबतच सर्वांगीण विकास साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळासाठी वेळ काढणे गरजेचे आहे.पूर्वीच्या काळी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी खेळण्यासाठी एकत्र यायचे.मात्र आधुनिक मोबाईलच्या या काळात अनेक मैदान खेळ लुप्त होत चालले आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिवसातील कमीत कमी एक तास वेळ खेळासाठी द्यावा असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बंडगर यांनी तर आभार अर्जुन माशाळकर यांनी मानले.
Leave a reply